आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतर पक्षातील नेत्यांना यापुढे फिल्टर लावूनच भाजपत प्रवेश - मुख्यमंत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सर्वपक्षीय नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर सत्ताधारी भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. ‘भ्रष्ट ठरलेल्या काेणत्याही चेहऱ्यांना भाजपत प्रवेश दिला जाणार नाही. फिल्टर लावूनच यापुढे प्रवेश दिले जातील’ अशी घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धुळ्यातील पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या व भाजपमध्ये जाऊन ‘पवित्र’ हाेण्याची संधी शाेधणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या इच्छेला सुरुंग लागणार असल्याची चिन्हे आहेत. तसेच प्रशासकीय सेवेतून निवृत्त हाेऊन राजकारणात प्रवेशोच्छुक असलेल्या कुठल्याही भ्रष्ट अधिकाऱ्याला भाजप तिकीट देणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी धुळ्यात केली. ‘महाराष्ट्र दुष्काळाने हाेरपळत असताना भाजप मात्र यात्रा काढण्यात गुंग आहे,’ असा आराेप दाेन्ही काँग्रेसचे नेते करत आहेत याकडे पत्रकारांशी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, ‘यात्रा काढायची परंपरा ही भाजपची आहे. यापूर्वी विराेधात असताना संघर्ष यात्रा काढल्या. त्यानंतर सत्तेत असताना संवाद यात्रा काढल्या. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या यात्रा या भाजपची काॅपी असून त्या डुप्लिकेट आहेत. आम्ही यात्रा काढल्यानंतर विराेधकांच्या यात्रा सुरू झाल्या. काँग्रेसची सध्या भ्रष्टाचाराची यात्रा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या यात्रेबाबत काही सांगू शकत नाही,’ असा टाेलाही त्यांनी लगावला. 

ईव्हीएमला दाेष देणारे बुद्धू; विराेधकांना टाेला
‘निवडणुकीत अपयश आले म्हणून ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांची अवस्था पेन खराब होते म्हणून परीक्षेत नापास झालो म्हणणाऱ्या बुद्धू मुलासारखी झाली आहे, असा टोला फडणवीस यांनी जळगाव येथे जाहीर सभेत विराेधकांना लगावला. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते ईव्हीएमला शिव्या देत असताना आम्ही मात्र जनतेत जाऊन गेल्या पाच वर्षांत काय काम केले हे सांगत आहोत,  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या टीमने चांगले काम केले. या टीम नसत्या तर आणखी नुकसान झाले असते. या टीम राज्यातही वाढवल्या जातील. केली जातील. त्यातून आपत्ती असलेल्या भागात तातडीने काम करता येईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...