आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : बँक, साखर कारखाना घाेटाळ्यात अडकलेले दिलीप साेपल शिवसेनेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘एस’ काँग्रेस आणि काँग्रेसकडून प्रत्येकी एक वेळा, अपक्ष म्हणून एकदा तर राष्ट्रवादीकडून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी बुधवारी राष्ट्रवादीला रामराम ठाेकत शिवसेनेत प्रवेश केला. १९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडून अाल्यानंतर युती सरकारमध्ये त्यांना सर्वप्रथम राज्यमंत्रिपद मिळाले हाेेते. शरद पवारांचे निकटवर्तीय अशी अाेळख असलेल्या साेपल यांना २०१२ मध्ये राष्ट्रवादीच्या काेट्यातून स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे मंत्रिपदही मिळाले हाेते. १९८५ ते २०१४ या २९ वर्षांत सलग सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली. यामध्ये २००४ हे वर्ष वगळता सहा वेळा निवडून आले आहेत. दरम्यान, बार्शी तालुक्यातील खासगी साखर कारखाना व जिल्हा बँकेतील घाेटाळ्यात अडकल्याने साेपल यांनी सत्तापक्ष जवळ केला. युतीत बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला, असे मानले जाते.

व्यवसायाने वकील सोपल यांचा राजकीय प्रवास अचंबितच करणारा आहे. १९८५ ते १९९९ असे सलग चार टर्म निवडून आले. पहिल्यांदा १९८५ साली ते एस काँग्रेसकडून निवडून आले, त्यानंतर १९९० साली काँग्रेसकडून तर १९९५ साली अपक्ष म्हणून हॅट॰ट्रिक केली. १९९९ मध्ये यू टर्न घेत ते राष्ट्रवादीसोबत गेले. या वेळीही त्यांनी विजयी परंपरा कायम ठेवली. २००४ साली कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे राजा राऊत यांनी त्यांचा पराभव केला. मात्र खचून न जाता सोपल यांनी पुन्हा जनसंपर्क वाढवला. २००९ व २०१४ साली सलग दोन वेळा विजय मिळवला. २००९ साली राष्ट्रवादीने सोपल यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. 
 

आर्यन शुगर, जिल्हा बँकेचा घोटाळा...
साेलापूर जिल्हा बँकेत नियमबाह्य कर्जवाटप प्रकरणी भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली हाेती. साेपल बँकेचे संचालक हाेते. २०१८ मध्ये शासनाने जिल्हा बँकेचे संचालक मंडळच बरखास्त केले. दाेषी संचालक, अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. मात्र लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँकेचे आणखी दाेन संचालक रणजित माेहिते व विजयसिंह माेहिते या पिता-पुत्रांनी भाजपत प्रवेश केला आणि नंतर याचिकेला स्थगिती मिळाली. त्यामुळे साेपलांनाही तूर्त दिलासा मिळाला. खामगाव (ता. बार्शी) येथील आर्यन शुगर हा खासगी कारखाना साेपल यांच्याशी संबंधित आहे. या कारखान्याकडे शेतकऱ्यांची २१ काेटींची देणी थकीत आहेत. अशा प्रकरणात गाेत्यात आल्यामुळे अखेर साेपल यांनी सत्ताधारी पक्षाला जवळ केल्याचे मानले जाते.
 

आता ठाकरेंच्या दारी पाणी भरायला गेलात : पाटील
माळशिरस - ‘उभी हयात एका बाजूला घातली आणि तिन्हीसांजेला उद्धव ठाकरेंच्या दारात पाणी भरायला गेलात... वाह रे विश्वासू सहकारी... लोक कसा विश्वास ठेवतील तुमच्यावर,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोपल यांच्या सेना प्रवेशाचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘आजवर साेपल विधानसभेत सेनेवर टीकाच करत आले. मात्र आज ते त्यांच्याच दारी बंधन बांधायला गेले. सत्तेसाठी साेपल हे उडी मारून तिकडे गेलेत हे शिवसेनेलाही लवकरच कळेल.’