आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : अखेर ठरलं; एक सप्टेंबरला नारायण राणे करणार भाजप प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - माजी मुख्यमंत्री नारायण राणे १ सप्टेंबर राेजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत साेलापूरमधील कार्यक्रमात भाजपत प्रवेश करतील. आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही ते भाजपत विलीन करतील. स्वत: नारायण राणे यांनी गुुरुवारी ही माहिती दिली. याच कार्यक्रमात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भाेसले व उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह हेही भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते असलेल्या राणेंनी उद्धव ठाकरेंशी मतभेदानंतर पक्ष साेडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला हाेता. तिथे काही वर्षे मंत्रिपदही भूषवले. मात्र मुख्यमंत्रिपदाची इच्छा पूर्ण हाेत नसल्याने व काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून राणेंनी वर्षभरापूर्वीच काँग्रेसला साेडचिठ्ठी दिली व स्वत:चा पक्ष स्थापन केला. भाजपने ‘एनडीए’त या पक्षाला सामावून घेत राणेंची राज्यसभेवर वर्णी लावली हाेती. 

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष :
भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेना व राणे यांच्यात राजकीय वैर आहे. राणेंना युतीत थारा देऊ नये, अशी उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेत्यांची भूमिका होती. मात्र विराेध डावलून भाजपने राणेंना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपत विधानसभा निवडणुकांच्या ताेंडावरच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...