MahaElection / MahaElection : 'सरकारला कशाची मस्ती आलीये... कसली शेतकऱ्यांची टिंगल टवाळी लावलीये' - अजित पवार

या सरकारला मातीत गाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही - धनंजय मुंडे
 

प्रतिनिधी

Aug 19,2019 04:10:51 PM IST

औरंगाबाद - या सरकारला कशाची मस्ती आलीय शेतकऱ्यांची कसली टिंगल टवाळी सुरु आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी बालानगर येथील जाहीर सभेत केला. शिवस्वराज्य यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यातील पहिली सभा औरंगाबाद जिल्हयातील बालानगर येथे झाली. यावेळी बोलताना अजितदादा पवार यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. पुरग्रस्त भागात भाजपचे मंत्री सेल्फी काढणार्‍या भाजप मंत्र्याचा आणि सरकारचा भोंगळ कारभारावर अजितदादा पवार यांनी जोरदार आसूड ओढला.

यात्रेतील अजित पवार यांचे मुद्दे

> ही यात्रा सत्ता परिवर्तनासाठी असली तरी मन परिवर्तन करावी लागणार आहे म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा असल्याचे अजितदादा पवार म्हणाले.


> दहा हजार कुटुंबांना कुटुंब संच व एका महिन्याचे रेशन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे देणार असल्याचेही अजितदादा पवार म्हणाले.

> शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही. या सरकारच्या काही गोष्टी डोक्यातच येत नाही. नुसती बनवाबनवी सुरु आहे.

> ब्रह्मगव्हाण योजनेला २२२ कोटी रुपयांची मंजुरी दिली होती. आज त्या योजनेला ५०० कोटींच्यावर काम गेले आहे. कसलं काम करतंय हे सरकार


> आमचं सरकार सत्तेत आल्यावर पहिल्यांदा स्थानिकांना ७५ टक्के रोजगार द्यावा असा कायदा करणार.

> आम्हाला फक्त शरद पवार साहेबांनी कर्जमाफी दिली असा लोकांमधून एक आवाज आला त्यावेळी अरे मी त्यांचाच पुतण्या सांगतोय आमची सत्ता येऊ द्या पहिली दिली कर्जमाफी तशी पुन्हा देवू असे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले.


> या भागातील धरणाचा पाणीसाठा मायनस असल्याची आकडेवारी अजितदादा पवार यांनी मांडली आणि या सरकारला का कळत नाही अशी विचारणाही केली.


> आज राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवाला मातीमोलपणा आलाय. किड्यामुंग्यासारखे लोक आज मरत आहेत. अनेक कंपन्या बंद पडत आहेत. तरुणांना रोजगार मिळत नाहीये. शिक्षक भरती बंद आहे. आमचं सरकार आल्यावर सर्व रिक्त पदे तात्काळ भरणार आहे.


> अनेक योजनांना हे सरकार स्मार्ट सिटी, मेक इन महाराष्ट्र अशी काय इंग्लिश नावं देतंय की ग्रामीण भागात लोकं गपगार होतात.यावेळी निवडणूकीत जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका अनेक गाजरं दाखवायला येतील सावध रहा असे आवाहनही अजितदादा पवार यांनी केले.


> उद्याची निवडणूक तरुण पिढीचे भवितव्य ठरवणारी, शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करणारी निवडणूक आहे. यावेळी अजितदादा पवार यांनी राज्यातील अनेक विषयांना हात घालताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

या सरकारला मातीत गाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही - धनंजय मुंडे

> आपल्या सुख दु:खात कोण असतं याचा विचार करा आणि या सरकारला मातीत गाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

> सामान्य माणसाला आधार कुणी दिला तर तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे याचा मला अभिमान आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.


> या सभेत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांना काढण्यात आलेल्या ईडीच्या नोटीसीवर भाष्य केले. राज ठाकरे यांना इडीची नोटीस काढली तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी भाजपाचा पर्दाफाश केला म्हणून त्यांना नोटीस बजावली आहे. तुम्ही जास्त विरोधात बोलता काय घ्या ईडीची नोटीस... अरे हे असले कसले घाणेरडे राजकारण सुरु आहे असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.

> इकडे- तिकडे दोन-तीन गेले म्हणून पक्ष संपत नाही. हे सांगतानाच राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या नेत्यांचा समाचार धनंजय मुंडे यांनी घेतला.

> राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे राज्य असताना राज्यात अनेक विकास कामे झाली आहेत.


> भाजपाचे नेते चंद्रकात पाटील यांना पुरग्रस्त भागात लोकं विचारणा करतील, जाब विचारतील म्हणून पुरग्रस्त कोल्हापूर येथे १४४ कलम लावले होते असेही धनंजय मुंडे म्हणाले.


> फडणवीस-ठाकरेंच्या सरकारने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. मात्र आताच्या यात्रेत त्यांना छत्रपतींचा आशिर्वाद नकोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकांच्या एक वीटही रचली नाही तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम केलेले नाही.


> पुन्हा मीच मुख्यमंत्री हेच सांगायला महाजनादेश यात्रा तर दुसरीकडे शिवसेनेचे युवराज जनआशिर्वाद यात्रा काढून मीच मुख्यमंत्री यासाठी परंतु आमची शिवस्वराज्य यात्रा रयतेचं राज्य आणण्यासाठी आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा सुरु आहे; तरुणांनो विचार करा - डॉ. अमोल कोल्हे

> तुमच्या भविष्यावर वरंवटा फिरवला जातोय तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा कोण तरी करतोय याचा तरुणांनी विचार करावा असे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.


> जनआशिर्वाद घेण्यासाठी युवराज आले तर त्यांना तुमचा आमदार पैठणमध्ये काम करतोय का? हे विचारा... पाच वर्षात तुम्ही कुठे होता हेही विचारा आणि जनतेच्या पाठीशी उभं राहायचं असतं हे त्या जनआशिर्वाद काढणार्‍या लोकांना सांगा असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.


> २२ मंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली परंतु मुख्यमंत्र्यांनी सिंगल विंडो योजना राबवत क्लीनचीट देण्याचे काम केल्याचा आरोप डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.


> पाच वर्षांत पैठण तालुक्यातील एमआयडीसी मध्ये उद्योग धंदे आले का? . किती मुलांना रोजगार मिळाला असा सवालही डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.


> १ लाख ४२ हजार कंपन्या बंद झाल्या आहेत. बेरोजगारांचे तांडे आज महाराष्ट्रात नाक्यानाक्यावर पाहायला मिळत आहे. हे सगळं घडत असताना सत्ताधारी भाजप सेनेचे यात्रा काढतातच कशा हे लोकांनी त्यांना विचारायला हवे असेही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

> महाराष्ट्रावर आपत्ती आली त्यावेळी कोण काम करत होते हे मीडियाने दाखवले त्याबद्दल मीडियाचे आभार डॉ. अमोल कोल्हे यांनी मानले.


या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी आमदार संजय वाकचौरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, कबीर मौलाना आदींसह, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

X
COMMENT