MahaElection / MahaElection : हर्षवर्धन पाटील नाॅट रिचेबल; काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते हैराण

हर्षवर्धन यांनी पक्ष साेडू नये ही पवारांची इच्छा
 

प्रतिनिधी

Sep 06,2019 08:26:00 AM IST

पुणे - काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी स्वपक्षीयांसह राष्ट्रवादीवर जाहीरपणे आराेप करुन पक्षांतराचे संकेत दिल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘इंदापूरच्या जागेसंदर्भात आपली अजित पवारांशी सकारात्मक चर्चा झाली आहे, ते सकारात्मक आहेत. मात्र आज सकाळपासूनच हर्षवर्धन पाटील ‘नाॅट रिचेबल’ आहेत. त्यांच्याशी संपर्क हाेऊ शकलेला नाही. मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना चर्चेचे आवाहन करताेय. आता काय करायचं ते हर्षवर्धन यांनी ठरवायचे आहे,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांनी माध्यमांना दिली.


सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘इंदापूरच्या जागेसंदर्भात अजून कसलाच निर्णय झालेला नसताना हर्षवर्धन पाटील यांनी आमच्यावर केलेले आरोप अत्यंत धक्कादायक आहेत. त्यांच्याशी मी स्वतः कालपासून संपर्क करत आहे, मात्र त्यांचा फोन बंद आहे.’ असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हर्षवर्धन यांनी पक्ष साेडू नये ही पवारांची इच्छा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात म्हणाले, ‘हर्षवर्धन यांच्यासाठी इंदापूरची जागा सोडण्याचे वचन लोकसभेवेळी राष्ट्रवादीने दिले होते. मात्र, ते पाळले गेले नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहेत. मात्र, त्यांनी भाजपमध्ये जाऊ नये, ही शरद पवारांची इच्छा आहे.’

X
COMMENT