आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

mahaelection : धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक अन् समर्थकांमध्ये जुंपली; अंगावर धावून गेल्याने उडाला गाेंधळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांमध्ये जाेरदार वाद झाला. शाब्दिक खडाजंगी उडाल्यानंतर हे कार्यकर्ते चक्क एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे काहीकाळ गाेंधळ उडाला. संदीप बेडसे अन् ललित वारुडेे यांच्या समर्थकांमध्ये ही ठिणगी पडली. पक्ष निरक्षकांसमाेरच वाद सुरू झाल्यामुळे तणावही निर्माण झाला हाेता. 


राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती बुधवारी राष्ट्रवादी भवनात झाल्या. या वेळी पक्षनिरीक्षकांनी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाविषयी विचारणा केली असता जिल्हा परिषदेचे सदस्य ललित वारुडे यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्या वेळी संदीप बेडसे यांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यावरुन दाेन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये समोरासमोर शाब्दिक चकमक उडाली. ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मुलाखतीकरिता पक्षाने समिती नियुक्त केली. मात्र, त्या समितीमधील छगन भुजबळ हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित नव्हते. मात्र, समितीमधील उमेश महाले पाटील व नाना पाटील उपस्थित होते. याप्रारंभी पक्ष निरीक्षकांनी ध्येय धाेरणे मांडली. त्यानंतर शिंदखेडा विधानसभा मतदार संघासाठी जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे यांनी अापण इच्छुक असल्याचे निरीक्षक उमेश पाटील व नाना महाले यांना सांगितले. तर संदीप बेडसे यांनीही इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर रामकृष्ण पाटील यांनीही उमेदवारीची इच्छा व्यक्त केली. हे सर्व एेकून घेल्यानंतर पक्षनिरीक्षक उमेश पाटील यांनी याबद्दल शिंदखेडा तालुक्यातील कार्यकर्त्यांचे काही म्हणणे आहे काय? असे विचारले असता संदीप बेडसे यांच्या समर्थकांनी हात वर केले. त्यानंतर सुनील लांडगे यांनी ललीत वारुडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. तर बेडसे यांच्या समर्थकांनीही संदीप बेडसे यांनाच उमेदवारी देण्यात यावी. ललित वारुडे यांना आम्हीच निवडून आणले, असे म्हटले. त्यावरून वाद सुरू झाला. बेडसे व वारूडे यांच्या कार्यकर्त्यांची शाब्दिक चकमक उडाली. ते एकमेकांच्या अंगावरही धावून गेले. त्यात ललित वारुडे यांनी बैठकीत समर्थक आणायचे नाही, अशा सूचना होत्या. अन्यथा आम्हीदेखील समर्थक घेऊन शक्तिप्रदर्शन केले असते, असे सांगितले. वरिष्ठांच्या मध्यस्तीनंतर वाद मिटवण्यात आला. 

या वेळी उमेश पाटील यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुका या मतपत्रिकेवर घ्याव्या. ईव्हीएमसाठी जनप्रक्षाेभ होणे आवश्यक आहे. त्यानंतरच मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूका होतील. सरकारबद्दल अनेक घटकांची नाराजी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांना चांगलीच संधी आहे, असेही ते म्हणाले. नाना महाले यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी सुरुवातीला राजवर्धन कदमबांडे हे उपस्थित होते. मात्र, त्यानंतर काही कामासाठी त्यांना बाहेरगावी जायचे असल्याने निघून गेले. या वेळी संदीप बेडसे, एन.सी.पाटील, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील,अॅड.राजेंद्र पाटील,साहेबराव देसाई, शहराध्यक्ष कैलास चौधरी, महिला आघाडीच्या ज्योती पावरा, इरशाद जहागीरदार, कुणाल पवार, ललित वारुडे,सरोज कदम उपस्थित होते. 

 

भाजपत जाणाऱ्यांचा भ्रमनिराश 
भाजपत अनेकांनी प्रवेश केला. मात्र, तिथे त्यांना काय मिळाले. याउलट राष्ट्रवादी कॉग्रेसने त्यांना मंत्रिपद, महामंडळ दिले. परंतु कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये.एकेक मत मिळवून ते आपल्याला मिळेल, अशी रचना करा. ज्यांचे स्वातंत्र लढ्यात काही योगदान नाही ते राष्ट्रभक्ती शिकवतात. याकरिता आता निवडणूक सूत्रबध्द पध्दतीने लढवायची आहे. कार्यकर्त्यांनी केवळ सत्ता आणायची एवढेच लक्षात ठेवा, असे सांगितले, असे उमेश पाटील म्हणाले. 

 

कार्यकर्तेमधील वाद पक्षातील जिवंतपणा 
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत घेण्यासाठी आलेल्या पक्ष निरीक्षकांसमोरच दोन इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. कार्यकर्तेमध्ये उमेदवारीसाठी वाद होतो. हेच पक्षाचे जिवंतपणाचे उदाहरण असून पक्षाची ताकद त्या मतदारसंघात असल्यानेच उमेदवारीसाठी भांडणे होत असून आपल्याकडे उमेदवारीसाठी चढाओढ होत अाहे; ही चांगलीच बाब आहे. -उमेश पाटील, निरीक्षक 
 

शहरसाठी कदमबांडे यांचेच नाव.... 
शहर मतदारसंघासाठी शहराध्यक्ष कैलास चौधरी व साहेेबराव देसाई यांनी राजवर्धन कदमबांडे यांचे नाव सूचविले. त्यांच्या नावाबद्दल कुणाचेही दुमत नसल्याचे सांगितले. त्यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. या वेळी धुळे तालुक्यासाठी किरण शिंदे यांनी किरण पाटील यांचे नाव सुचविले. 


मुलाखती अंतिम असतील असे नाही....

निरीक्षक म्हणून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे समिती पक्षश्रेष्ठीना त्यांचा अहवाल देतील. मात्र, तेच अंतिम असेल असे नाही, उमेदवार निवडीच्या अनेक निकषामधील तो एक भाग आहे, असा इशाराही उमेश पाटील यांनी दिला. सत्तेत आपले सरकार आले तरच सर्वांचे महत्त्व राहील.