आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection | In 20 Years, BJP's Vote Share Has Increased By More Than 20%; The Votes Of Both The Congress Fell By 15%

MahaElection :२० वर्षांत भाजपची मते ३२%, आमदार दुपटीपेक्षाही जास्त वाढले; दाेन्ही काँग्रेसची मते मात्र १५% घटली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९९९ ते २०१४ या चार विधानसभा निवडणुकांतील यशापयशाचा आढावा घेतल्यास महाराष्ट्रातील राजकारण झपाट्याने बदलल्याचे दिसून येते. काँग्रेसमधील दिग्गज नेते शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चाैथा सक्षम पर्याय निर्माण झाला. पुढे या दाेन्ही काँग्रेसने एकत्र येत १५ वर्षे सत्ता संपादन केली असली तरी त्यांचे सूर मात्र कधीच जुळले नाहीत. एकमेकांचे खच्चीकरण करण्यातच या दाेन्ही पक्षांनी धन्यता मानल्याने २०१४ मध्ये सत्तेवरुन पायउतार हाेण्याची नामुष्की त्यांच्यावर आेढावली. या दुहीचा फायदा घेत राज्यात शिवसेना- भाजप वाढत गेली. सुरुवातीला ‘थाेरल्या भावा’चे बाेट धरुन माेठी हाेत असलेल्या भाजपने २००९ मध्ये मात्र शिवसेनेपेक्षा दाेन जागा जास्त मिळवून चमक दाखवून दिली हाेती. २०१४ मध्ये मात्र शिवसेनेच्या मदतीशिवाय इतिहास घडवला. १९९० नंतर राज्यात प्रथमच एखाद्या पक्षाने शंभरहून अधिक जागा पटकावण्याचा विक्रमही केला. या काळात शिवसेनेनेही स्वबळावर चांगली कामगिरी करत मतटक्का वाढवला असला तरी त्यांची आमदार संख्या सहाने घटली.  

भाजपची मते चार निवडणुकांत 14.54 % वरून थेट 46.92% वर; आमदार 56 वरून 122 वर
1999 मध्ये भाजपला 14.54% मते होती. चार निवडणुकांनंतर हा आकडा थेट 46.92% वर गेला. म्हणजेच भाजपची मते 32.38% वाढली आहेत. आमदारांची संख्याही 56 वरून 122 म्हणजेच 66 ने वाढली. विजयाच्या स्ट्राइक रेटमध्ये मात्र 47.86% वरून 46.92% अशी किरकाेळ घसरण झाली.

शिवसेनेची मतांची टक्केवारी वाढली, आमदार संख्या व विजयाचा स्ट्राइक रेट मात्र 20% कमी
1999 मध्ये शिवसेनेला 17.33% मते होती. चार निवडणुकांनंतर हा आकडा 19.5% वर गेला. म्हणजेच शिवसेनेची मते 2.17% मते वाढली. आमदारांची संख्या मात्र 69 वरून 63 अशी घसरली. त्यात 6 टक्क्यांनी घट झाली. विजयाचा स्ट्राइक रेट 42.85% वरून 22.34% पर्यंत म्हणजेच 20.51% घसरला.

काँग्रेसची आमदार संख्या 75 वरून 42 पर्यंत घसरली, मते 9% तर स्ट्राइक रेट 15% घटला
1999 मध्ये काँग्रेसला 27.2% मते होती. चार निवडणुकांनंतर म्हणजे 2014 च्या निवडणुकीत आकडा 18.1% पर्यंत घसरला. म्हणजेच काँग्रेसची मते 9.1% ने घटली. आमदारांची संख्या 75 वरून 42 अशी तब्बल 33 ने घटली. विजयाचा स्ट्राइक रेट 30.12% वरून 14.63% असा 15.49% ने कमी झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसची मते 5 टक्क्यांनी घटली, आमदारांचा आकडाही 17 ने घसरून 41 पर्यंत
1999 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 22.6% मते होती. चार निवडणुकांनंतर हा आकडा 17.4% पर्यंत घसरला. म्हणजेच राष्ट्रवादीची मते 5.2% ने घटली. आमदारांची संख्या 58 वरून 41 अशी 17 ने घसरली. विजयाचा स्ट्राइक रेट 24.89% वरून 14.74% असा 10.15% ने घसरला.