आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection: Jyotiraditya Scindia Will Decide Congress Candidate From Maharashtra For Assembly Election

MahaElection : विधानसभेला महाराष्ट्रातील काँग्रेसचे उमेदवार ज्याेतिरादित्य सिंधिया ठरवणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते ज्याेतिरादित्य सिंधिया यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने नेमलेल्या उमेदवार छाननी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाध्यक्षा साेनिया गांधी यांनी गुरुवारी महाराष्ट्रासाठी सहा जणांची स्क्रिनिंग समिती नेमली. त्यात हरिश चौधरी, मनिकम टागोर, सरचिटणीस मलिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, के. सी. पडवी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. लाेकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेसमधील तरुण नेत्यांना प्राेत्साहन मिळावे म्हणून ज्याेतिरादित्य यांच्यासारख्या तरुण नेत्याकडे महाराष्ट्रातील उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी पक्षाने साेपवली आहे. यातूनच यंदा तरुणांना जास्त संधी दिली जाईल, असे संकेतही पक्षाकडून देण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर अनेक जुने काँग्रेसचे नेते भाजप- शिवसेेनेत जात पक्षात अस्वस्थता आहे. त्यातही गटबाजीचे राजकारण थांबायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर सिंधिया याेग्य उमेदवार ठरवू शकतील, अशी केंद्रीय नेत्यांना आशा आहे.