आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : भाऊबंदकीचे ‘तट’; आमदार पुतण्या, भाऊ सेनेच्या वाटेवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राला काका- पुतण्यातील वादाचा ‘शाप’ आहे. ठाकरे, मुंडे कुटुंबीयांप्रमाणे आता राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे यांच्या परिवारातही हा वाद उफाळून आलाय.  सुनीलरावांचे पुतणे व श्रीवर्धनचे आमदार अवधूत हे राष्ट्रवादी साेडून शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. गुरुवारी त्यांनी वडील माजी आमदार अनिल तटकरे व भाऊ संदीप यांच्यासह उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. येत्या दाेन दिवसांत कार्यकर्त्यांशी बाेलून आपण पुढील निर्णय घेऊ, असे अवधूत सांगत असले तरी शिवबंधन बांधण्याचा त्यांना निर्णय पक्का मानला जाताे.विधानसभा निवडणुकीत अवधूत यांच्या मतदारसंघातून अदिती यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुनील तटकरेंकडून हाेत आहे. त्यामुळे अवधूत नाराज आहेत. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सुनील तटकरेंचा दबदबा आहे. त्यांचा मुलगा अनिकेत विधान परिषद आमदार तर मुलगी अदिती जि.प. अध्यक्षा आहे. त्यांचे बंधू अनिल विधान परिषद आमदार हाेते तर पुतणे अवधूतही आमदार आहेत. एकाच घरात इतकी पदे देऊनही वर्चस्वाचे वाद उफाळून येत असल्याबद्दल स्वत: शरद पवारांनीही आश्चर्य व्यक्त केले हाेते.  गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीपूर्वी सुनील यांनी स्वत:ची विधान परिषदेवर वर्णी लावून घेतली व मुलगी अदितीला श्रीवर्धनमधून उमेदवारी देण्याची याेजना आखली हाेती. मात्र अवधूत यांनी हट्टाने ही जागा स्वत:साठी घेतली.  ते अवघ्या ३५ मतांनी अवधूत निवडून आले.  काका आपल्याला पुढे येऊ देत नाही हा राग अनिल यांच्या मुलांमध्ये आहे. त्यामुळे संदीप यांनी २०१६ मध्येच शिवसेनेत प्रवेश केला हाेता. त्यावेळी शरद पवार यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवला हाेता.
 

राष्ट्रवादीपासून अलिप्त
एकेकाळी तटकरे यांचा वारसदार म्हणून अवधूत यांची ओळख हाेती. मात्र सुनील यांनी मुलीला पुढे करण्याचा प्रयत्न केल्यावर मात्र काका- पुतण्यात वादाची ठिणगी पडली. २०१४ च्या निवडणुकीत अवधूत यांच्या प्रचारातून सुनील यांची मुले अदिती आणि अनिकेत दूरच राहिले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही अवधूत यांनी नगराध्यक्षपद साेडले नाही. स्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू केल्यानंतर त्यांना हे पद साेडावे लागले. तेव्हापासून अवधूत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमापासून अलिप्तच राहिले.