आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection: MLA Choughale Ready For Hattrick , But The Groups Can Be Stop Them

MahaElection : हॅट्ट्रीक करण्यास आ. चौगुले सज्ज, पण गट-तट आडवे येणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा  - उमरगा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले गेली दोन टर्म तालुक्याचे नेतृत्व करीत आहेत. गेल्या विधानसभेत त्यांनी काँग्रेसचे किसन कांबळे यांचा पराभव केला. येणाऱ्या निवडणुकीत हॅट््ट्रिक साधण्याच्या दृष्टीने प्रचाराची रणनीती आखली जात आहे. मात्र पक्षांतर्गत गटतटांचा त्यांना फटका बसण्याची शक्यताही अाहे. 

उमरगा मतदारसंघात गेल्या वीस वर्षांपासून  काँग्रेस व शिवसेना यांच्यातच लढत राहिली आहे. यंदाही विद्यमान आमदार  चौगुले यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी पालकमंत्री तानाजी सावंत गटाकडूनही सक्षम उमेदवाराचा  शोध सुरू अाहे.   माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे मतदार संघावर वर्चस्व आहे. शिवाय आमदार चौगुले यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांची जोड व जातीय समीकरण त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणारे आहे. गेल्या पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसने भाजपच्या मदतीने यश मिळवले असले तरी विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे असेल. युती न झाल्यास भाजपकडून कैलास शिंदे यांचे नाव अग्रस्थानी आहे. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादीमधील एक गट कैलास शिंदे व आ. चौगुले यांना मदत करण्याची शक्यता आहे.   काँग्रेस इच्छुकांची यादीही मोठी असून त्यात दिलीप भालेराव, जालिंदर कोजणे, विजय वाघमारे, अशोक सरवदे हे दावेदार आहेत. मात्र  आ. बसवराज पाटील कोणाला प्रथम प्राधान्य देणार यावरही बरेच अवलंबून आहे. वंचितमुळे दलित, मुस्लिम अन्य समूह एकत्र आल्यास काँग्रेसला बसण्याची शक्यता  आहे. 
 

हे असू शकतात संभाव्य उमेदवार 
महायुतीकडून आमदार ज्ञानराज चौगुले यांची उमेदवारी निश्चित असून युती न झाल्यास जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे  भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून जालिंदर कोकणे, दिलीप भालेराव यांच्यात स्पर्धा सुरू आहे. वंचित आघाडीकडून डॉ. सुभाष वाघमारे, रामभाऊ गायकवाड, डॉ. चंद्रकांत गायकवाड ही नावे चर्चेत आहेत.
 

२०१४ मधील विधानसभेची स्थिती
ज्ञानराज चौगुले :    शिवसेना     ६५,१८७ 
किसन कांबळे  :    काँग्रेस    ४४७३६
कैलास शिंदे  :    भाजप    ३२५२१
संजय गायकवाड  :   राष्ट्रवादी       १५५६९
 

या आहेत मतदारसंघातील समस्या
> औद्योगिक वसाहतीत उद्योगाची वणवा व मुलभूत सुविधांचा अभाव.
> लोहारा शहरास कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना.
रस्ता चौपदरीकरणाचे सहा वर्षांपासून निकृष्ट काम अद्यापही अपूर्ण.
> दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित शिवाय जलसंधारण कामाकडे दुर्लक्ष.
> सिंचनासह रोजगार निर्मितीचा प्रश्न अधांतरी राहिल्याने बेरोजगारीत प्रचंड वाढ.