आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी; मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधत दिला पक्षप्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घरवापसी केली. भास्कर जाधव यांनी आज सकाळी औरंगाबादेत विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा सोपवला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधत पक्षप्रवेश दिला.  यावेळी खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. भास्कर जाधव यांचे शेकडो कार्यकर्तेही मातोश्रीवर हजर होते.
 
भास्कर जाधव यांनी औरंगाबादेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. बागडेंनी जाधव यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अनिल परब यावेळी उपस्थित होते. 

भास्कर जाधव पूर्वी शिवसेनेतच होते. मात्र पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मंत्रीपदही भूषवले आहे. मात्र आपल्या कर्तृत्वाला राष्ट्रवादीत फारसा वाव मिळत नसल्याचे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. 
 

बातम्या आणखी आहेत...