आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : राष्ट्रवादीचे भास्कर जाधवही शिवसेनेच्या वाटेवर?; छगन भुजबळांचे तळ्यात-मळ्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रविवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे जाधव हेसुद्धा राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा आहे. गुहागर हा पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ होता. त्यामुळे जाधव अत्यंत सावधपणे पावले टाकत आहेत. 

लोकसभा निवडणुकीतही त्यांनी तटकरे यांच्याऐवजी आपल्याला उमेदवारी द्यावी म्हणून मागणी केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या मुलाखतीच्या वेळी जाधव यांनी गुहागरऐवजी चिपळूणमधून उमेदवारी मागितली आहे. चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शेखर निकम (सहकारमहर्षी गोविंदराव निकम यांचे चिरंजीव) उमेदवारीचे दावेदार आहेत. मागच्या निवडणुकीत जेमतेम दोन हजार मतांनी ते पराभूत झाले होते. या वेळी तिवरे धरणफुटीच्या विषयावरून विद्यमान आमदार शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांच्याविरोधी वातावरण असल्यामुळे निकम यांची बाजू मजबूत मानली जाते. तेथून उमेदवारी मागून जाधव गुहागरची जागा आपल्या मुलासाठी रिकामी करू पाहत असल्याचे बोलले जाते. पक्ष सोडताना कारणे देण्यासाठी जाधव यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
 

भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला घोलप यांचा विरोध
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा शिवसेनेतील प्रवेशही तळ्यात-मळ्यात चालला आहे. रविवारी शिवसेनेचे नाशिकमधील नेते बबनराव घोलप यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला तीव्र विरोध करताना त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोणते तोटे अपेक्षित आहेत हे नाशिकच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना सांगितल्याचे कळते.

बातम्या आणखी आहेत...