MahaElection / MahaElection : शिवसेनेचे राज्यमंत्री राठोड म्हणतात, फडणवीसजी, पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या  कामांचा वाचला पाढा
 

विशेष प्रतिनिधी

Aug 07,2019 08:03:00 AM IST

अकोला - भाजपच्या मतदारसंघात प्रचार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथमच शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात कारंजा येथे जाहीर सभा घेतली. त्यांचे स्वागत करताना राठोड म्हणाले, फडणवीसजी “पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच बनणार’ काही काळजी नकाे.


मागील निवडणुकीत भाजपने लढवलेल्या विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू आहे. गेल्या ६ दिवसांपासून भाजपच्या ३४ मतदारसंघांतून फिरणारी ही यात्रा आज प्रथमच शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात आली. त्यांचे स्वागत करताना राठोड यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांंची यादी वाचली आणि मुख्यमंत्र्यांंंच्या कार्यशैलीचे कौतुक करताना “तुम्हीच पुढील मुख्यमंत्री होणार’ अशा शुभेच्छा दिल्या. युती होणार का आणि मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा ऐरणीवर असताना राठोडांंंच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी घेतलेली विशेष सभा आणि राठोडांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा विशेष चर्चेत आल्या.

X
COMMENT