• Home
  • VidhanSabha 2019
  • MahaElection | Shiv Sena MP Sanjay Raut said our doors are not open for people who only want to become MP MLA or minister

MahaElection / आमदार, खासदार किंवा मंत्रीपदासाठी युतीत सहभागी होऊ नका; खासदार संजय राऊत यांची पक्षांतर करण्याऱ्या नेत्यांना ताकीद

आमच्या युतीत सहभागी व्हायचे असेल तर हिंदुत्व विचारधारा स्वीकारायला हवी - संजय राऊत 
 

दिव्य मराठी वेब

Sep 11,2019 05:54:00 PM IST

नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते शिवसेना आणि भाजपात प्रवेश करत आहेत. दरम्यान पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी फक्त मंत्रीपद, खासदार किंवा आमदारकीसाठी आमच्या युतीत सहभागी होऊ नका अशी ताकीद शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. युतीत येण्यापूर्वी तुम्हाला हिंदुत्व विचारधारेला आत्मसात करावे लागेल असे ते म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपा किंवा शिवसेनेत सामिल होत आहेत. मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते भाजपात प्रवेश करण्यार असल्याची चर्चा होत आहे.

हिंदुत्वाच्या विस्ताराची आकांक्षा
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, ज्या नेत्यांना आमच्या युतीत सहभागी होण्याचा विचार करत आहेत त्यांनी युतीत येण्यापूर्वी पूर्णपणे हिंदुत्व अंगीकारायला हवे. फक्त खासदार, आमदार किंवी मंत्रीपदाच्या आशेने येणाऱ्या लोकांसाठी आमचे दरवाचे बंद आहेत. आम्ही देशभरात हिंदुत्वाचा विस्तार करायचा आहे. त्यांना जर हे स्वीकार असेल तर आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो.

विरोधी पक्षाला आपले नेते सांभाळता आले नाही
ते पुढे बोलताना म्हणाले की, लोकशाहीत एक मजबूत विरोध पक्ष असावा असे आम्हाला वाटते. पण आपल्या नेत्यांना सांभाळण्यात विरोधी पक्षाला अपयश आले आहे. उर्मिला मातोंडकर आणि कृपाशंकर सिंह यांसारखे नेते देखील त्यांच्यासोबत राहण्यास तयार नाहीत. लोकशाहीत एक सशक्त विरोधी पक्ष असणे आवश्यक असते.

X
COMMENT