आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection : Shivsena Chief Uddhav Thackeray Chooses To Keep Mum On Rumors Of Chhagan Bhujbal Entering Shivsena

MahaElection : छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे मौन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकेकाळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चा होत आहेत. मात्र उद्धव यांनी भुजबळांच्या शिवसेना प्रवेश चर्चांबाबत चुप राहणे पसंत केले आहे.

छगन भुजबळ शिवसेनेत येणार असल्याच्या चर्चांमुळे नाशिक शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध करण्यासाठी नाशिकचे जिल्हाप्रमुख, तालुकाध्यक्ष, आमदार, खासदार उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेले होते. 

आपला भुजबळांना विरोध असल्याचे मत शिवनेसेचे माजी आमदार बबनराव घोलप, तालुकाध्यक्ष, जिल्हाप्रमुख यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान तुम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल असे खासदार हेमंत गोडसे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकारी आणि खासदारांना निश्चिंत राहण्याचे आश्वासन दिले. 

बातम्या आणखी आहेत...