आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : राष्ट्रवादी काँग्रेससह तटकरे कुटुंबाला धक्का; सुनिल तटकरेंचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर? उद्धव ठाकरेची घेतली भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसण्याचे सत्र सुरुच आहे. पक्षातील अनेक नेते एकामागोमाग एक भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचा पुतण्या आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात आमदार अवधूत तटकरे आणि अनिल तटकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान दोन दिवसांत आपली राजकीय भूमिक स्पष्ट करण्याचे संकेत दिले.
 
आमदार अवधूत तटकरे यांनी यापूर्वीही उद्धव यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. 
 

कोण आहेत अवधूत तटकरे?
आमदार अवधूत तटकरे हे तटकरे कुटुंबातील एक बडे प्रस्थ आहेत. विद्यमान आमदार, रोहयोची माजी नगराध्यक्ष तसेच पक्षात दबदबा असणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. एकेकाळी सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांना ओळखले जाते. अवधूत यांची आक्रमकता आणि राजकीय महत्त्वाकांक्षा सुनिल तटकरेंसाठी नेहमीच अडचणीची ठरली. सुनील तटकरेंची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर आमदारकी आपल्यालाच मिळायला हवी असा दावा करत अवधूत यांनी काकांनाच आव्हान दिले होते. तेव्हापासून तटकरे कुटुंबात वाद निर्माण झाल्याचे बोलले जाते. 

बातम्या आणखी आहेत...