आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection: Sushil Kumar Shinde Could Have Stopped Leaders Which Gone In Another Party

MahaElection : सुशीलकुमार शिंदेंना गळती थांबवता आली असती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्यात युतीच्या येेणाऱ्यांची संख्येत वाढ होतेय. यात सोलापूर अपवाद नाही. आमदार सिद्धाराम म्हेत्रे, भारत भालके भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते.  तशा हालचाली सुरु आहेत. काँग्रेसचे म्हेत्रे, भालके, माने हे पक्ष सोडून जात असताना हा काँग्रेसला धक्का समजला जातो. त्यांची नाराजी समजून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेस पक्षातील गळती थांबवता आली असती. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव शल्य असून, तेही गप्प राहणे पसंत करत आहेत. माजी आमदार दिलीप माने, रश्मी बागल हे शिवबंधन बांधत असले तरी ते शिवसेनेत तिकिटासाठी इच्छुक होतील आणि पक्षांसमोर अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शिवसेना व भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या आणि मतदार संघ पाहिले तर युती होते की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दक्षिण सोलापुरात सुभाष देशमुख यांना दिलीप माने पर्याय ठरु शकतात. शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख यांना महेश कोठे पर्याय ठरु शकतात. शहर मध्यमध्ये भाजपला कोठे, गणेश वानकर, माने, बरडे हे पर्याय ठरु शकतात. मोहोळ व दक्षिण सोलापुरात भाजपाच्या विरोधात माने यांची ताकत वापरत शिवसेना तेथे प्रबळ ठरु शकते. त्यामुळे माने यांच्या हातात शिवबंधन बांधण्याची तयारी शिवसेना करत आहे. माने यांचा फायदा होत असताना शिवसेने समाेर अडचण येऊ शकते. शहर मध्यमध्ये महेश कोठे, दक्षिण सोलापुरात अमर पाटील व गणेश वानकर शिवसेनेकडून इच्छुक असताना मानेमुळे अडचण येऊ शकते. सर्वात जास्त भिती कोठे यांनाच आहे्र कारण त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न आहे. 

जिल्ह्यातील आघाडीतील नेते युतीत जात असताना काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे गप्पच आहेत. माने पक्ष सोडणार हे शिंदेना यापूर्वीच माहिती असणार. माने यांच्या विरोधात काँग्रेसचे बाळासाहेब शेळके बोलत असताना शिंदे यांनी तत्काळ दोन्ही नेत्यांना एकत्र बोलवून नाराजी दूर करणे अपेक्षीत होते. म्हेत्रे काँग्रेस सोडून गेल्यास अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसचे प्रबळ नेते कोण राहणार यांची विचार करुन केंद्रीय नेते शिंदे यांनी बैठक घेऊन काँॅग्रेसची जिल्ह्यातील गळती थांबवता आली असती. पंढरपुरात दोन वेळा आमदार झालेले भालके भाजपच्या वाट्यावर आहेत. हे नेते मी काँग्रेसमध्ये राहणार असे ठामपणे सांगत नाहीत. कार्यकर्त्यांची इच्छा, असे सांगून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. पुढील काळात चाकोते परिरवातील काहीजण भाजपाच्या वाट्यावर आहेत. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे माजी महापौर अलका राठोड दक्षिण सोलापुरात विधानसभा मतदार संघातील काँग्रेस व भाजपाच्या विरोधात तिसरा पर्याय शोधण्यासाठी झालेल्या बैठकीच्या संयोजनात गेल्या.
 

बातम्या आणखी आहेत...