आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : आठव्यांदा किल्ला राखण्याचे प्रदेशाध्यक्ष थोरातांना आव्हान; पूर्वीचे पक्षांतर विराेधक विखे आता प्रतिस्पर्धी पक्षात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर (जि. अहमदनगर) - १९८५ पासून सलग सातवेळा संगमनेर मतदारसंघातून मताधिक्याने निवडून येत काँग्रेसचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बालेकिल्ला मजबूत ठेवला आहे. मात्र यंदा आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना थोरातांसमोर मतदारसंघातील लोकाश्रय नसलेल्या विरोधकांपेक्षा त्यांचेच एकेकाळचे पक्षातंर्गत सहकारी आणि नुकताच भाजपचा झेंडा हाती घेतलेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय यांच्यावर मात करण्याचे आव्हान असेल. यावेळी थोरातांविरोधात कोण लढणार याची उत्सुकता आहे.


लाेकसभा निवडणुकीतील घडामोडीनंतर थोरात यांच्याविरोधात विखे पिता-पुत्रांनी उघडपणे विरोधी भूमिका घेतली. यापूर्वी आपले बालेकिल्ले कायम राखण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अप्रत्यक्ष मदत केली. यावेळी मात्र विखेंनी घेतलेली भूमिका येथील थोरात विरोधकांना बळ देणारी ठरली. विखेंच्या जाण्याने काँग्रेसची सर्व सूत्रे बाळासाहेब थोरात यांच्या हाती आली. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही आली. 


थोरातांना मतदारसंघातच अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याविरोधात सेना-भाजपला अद्याप उमेदवार मिळू शकला नसला तरी अनेकजण इच्छुक आहेत. या इच्छुकांसोबत विखे गटाकडून थोरात यांच्याविरोधात जिल्हा परिषद अध्यक्ष व विखे यांच्या पत्नी शालिनी विखे यांचेही नाव चर्चेत आणत त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. युतीच्या जागावाटपात ही जागा सध्या सेनेच्या वाट्याला असल्याने ती मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.

 

हे असू शकतात संभाव्य उमेदवार 
बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिवसेनेकडून जनार्दन आहेर, अप्पा केसेकर, संग्राम जोंधळे, शरद थोरात, शाळीग्राम होडगर, अमर कतारी, साहेबराव नवले, रावसाहेब खेवरे यांना संधी मिळू शकते. भाजपकडून डॉ. अशोक इथापे, राजेश चौधरी, निवृत्ती महाराज देशमुख, शालिनी विखे, धनश्री विखे, राधावल्लभ कासट, विखे समर्थक वसंत गुंजाळ, वसंतराव देशमुख, अॅड. बापुसाहेब गुळवे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुधाकर रोहोम यांच्या नावांची समर्थकांत चर्चा आहे. 

 

पठार भागातील पाणीप्रश्न महत्त्वाचा
पठार भागातील पिण्याचे पाणी येथे आजही सुरू आहे. टँकरने पाणीपुरवठा, संगमनेर शहरामध्ये पावसाळ्यात दिवसाआड एकवेळ पाणी पुरवठा हाेतो आणि तोही गढूळ पाण्याचा. तसेच येथे रस्त्यांचे प्रश्न, रोजगारासाठी स्थलांतर, शेतीचे प्रश्न आदी समस्या सोडवण्याची आशा लोकप्रतिनिधींकडून आहे. 

बातम्या आणखी आहेत...