आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : मित्रपक्षांसाेबत जागावाटपाबाबत लवकरच बोलणी करणार: थाेरात: राज्यात वंचित आघाडीमुळे ९ जागा गमावल्याची खंत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच जागावाटपाबाबत बाेलणी केली जातील. तसेच राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे मानणाऱ्या समविचारी पक्षांना साेबत घेऊन त्यांनाही जागावाटपात स्थान देऊ. वंचित बहुजन आघाडीमुळे लाेकसभा निवडणुकीत आम्हाला नऊ जागा गमावाव्या लागल्या आहेत. त्याचा परिणाम आघाडीवर झालेला असून फायदा भाजप-शिवसेनेचा झाल्याने आम्ही एकत्र येणे गरजेचे आहे, असा माझा आग्रह आहे. प्रकाश आंबेडकर यांना याबाबत पत्रव्यवहार करून त्यांच्याशी जागांची बाेलणी करण्याकरिता वेळ मागण्यात आली असून ठराविक कालावधीत जागावाटपाची बाेलणी पूर्ण करू, असे मत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांनी व्यक्त केले आहे. 


पुणे श्रमिक पत्रकार संघ आयाेजित वार्तालाप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे व्यासपीठावर उपस्थित हाेते. थाेरात म्हणाले, ‘एखादी गाडी टाॅप गिअरमध्ये चालली असताना तिचा चालक ज्या प्रकारे बदलताे त्याप्रमाणे माझ्याकडे नवीन जबाबदारी आली आहे.’ १५ आॅक्टाेबरपर्यंत निवडणूक संपून दिवाळीत नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप हाेईल, असा अंदाज आहे. मुख्यमंत्री साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून विराेधी पक्षातील नेत्यांना स्वत:च्या पक्षात घेतात ही बाब लाेकशाहीला मारक आहे. राज्य सरकार जाहिरातींच्या माध्यमातून आभासी चित्र निर्माण करत आहे. ‘दुष्काळात त्यांची भाषणे एेकली तरी पाऊस पडेल’, अशी वेगवेगळी स्वप्ने ते दाखवतात.

 

भाजपमध्ये  नव्या नेतेमंडळीच्या प्रवेशामुळे जुने निष्ठावान कार्यकर्ते  नाराज
काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते भाजप-शिवसेनेत जात आहे या प्रश्नावर थाेरात म्हणाले, आमचे पक्षातील नेत्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. भाजपमध्ये नवीन नेतेमंडळी येत असल्याने त्यांचे पक्षातील जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे. काँग्रेस पक्षाला इतिहास, परंपरा असून शाश्वत विचार असल्याने पूर्ण शक्तीनिशी आम्ही यापुढे वाटचाल करू. पक्षांतर करणाऱ्यांच्या जागी तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न आम्ही करू. निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १६४ जागा निवडून येतील. सत्ताधारी २२० जागा त्यांचे येतील असे सांगत सुटले असून ते २८८ जागांवर स्वत:चा हक्क सांगत नाहीत हे आपले नशीब आहे. लाेकसभेला मतदार वेगळा विचार करत असताे, परंतु विधानसभा निवडणुकीला ताे दुसऱ्या पक्षाला संधी देत असताे. राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल, अशी मला आशा आहे. लाेकसभा निवडणुकीत प्रचार केल्यानंतर अपेक्षित यश न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जाेश भरून त्यांना साेबत घेऊन काम करणे हे माझ्यासमाेरील माेठे आव्हान आहे.