आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- राज्य सरकारच्या विविध पदभरतीच्या परीक्षा ‘महापरीक्षा पोर्टल’व्दारे घेण्यात येतात. मात्र या ‘महापरीक्षा पोर्टल’मध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याचे समोर आले असून प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या परीक्षार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे हे ‘महापरीक्षा पोर्टल’ तात्काळ बंद करावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.22) महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
आ.सतीश चव्हाण यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने 2017 मध्ये सरकारी पदभरती करण्याची जबाबदारी ‘महाआयटी’ विभागाकडे दिली होती. या विभागाने पदभरतीच्या परीक्षा घेण्यासाठी ‘महापरीक्षा पोर्टल’ची निर्मिती केली. सध्या राज्यात विविध पदभरतीच्या परीक्षा या ‘पोर्टल’व्दारे घेण्यात येतात. मात्र एखादा परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर असला तरी त्याचे नाव अंतिम गुणवत्ता यादीत येणे, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात देणे, अनेक परीक्षांमध्ये चुकीचे प्रश्न विचारून चुकलेल्या प्रश्नांचे सरसकट गुण बहाल करणे असे अनेक गैरप्रकार समोर आले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या परीक्षार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून नोकरी न मिळाल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांमध्ये ‘महापरीक्षा पोर्टल’ विरोधात प्रचंड असंतोष पाहण्यास मिळत आहे. या विद्यार्थ्यांनी विविध जिल्ह्यांत हजारोंच्या सं‘येने मोर्चे, आंदोलने करून हे ‘महापरीक्षा पोर्टल’ तात्काळ बंद करा अशी मागणी केली होती. मात्र त्याची शासनाकडून काहीच दखल घेण्यात आली नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी पत्राव्दारे निदर्शनास आणून दिले आहे.
शैक्षणिक ‘हब’ म्हणून पुढे येत असलेल्या औरंगाबाद शहरात मराठवाड्यातील जवळपास 25000 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. यातील बहुसं‘य विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून आर्थीक परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थी मिळेल ते काम करून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय लक्षात घेता ‘महापरीक्षा पोर्टल’ तात्काळ बंद करावे अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.