आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिन : राजधानीत लाखोंचा भीमसागर, चैत्यभूमी बाबासाहेबांच्या जयघोषाने दुमदुमली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डाेक्यावर निळी टाेपी, हातात झेंडा, काखेला सामानाची बॅग अडकवून महामानव डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर उसळलेल्या लाखाेंच्या भीमसागराने महामानवाला अभिवादन केले. निळ्या लाटा चैत्यभूमीवरून सरकत हाेत्या. दादर स्टेशनवरून 'जबतक सूरज-चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा' अशा घाेषणा देत अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे चैत्यभूमीकडे सरकत हाेते. दादर रेल्वेस्टेशन ते शिवाजी पार्क-चैत्यभूमीपर्यंत पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त हाेता. शिवाजी पार्क ते चैत्यभूमीचा परिसर प्रचंड गर्दीने अाेसंडून वाहत हाेता. 

 

या अनुयायांना चैत्यभूमीपर्यंत पाेहोचण्यामध्ये काेणतीही अडचण येऊ नये यासाठी विविध स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते विशेष मेहनत घेत हाेते. मुंबई महानगरपालिका तसेच सामाजिक संघटनांनी वाटेत पिण्याचे पाणी तसेच नाष्ट्याची माेफत साेय केल्यामुळे भीमप्रेमी समाधान व्यक्त करत हाेते. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने दादर रेल्वेस्थानक ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केल्यामुळे रस्त्यांनी माेकळा श्वास घेतला. त्यामुळे अनुयायांनाही पायी चालताना काेणतीही अडचण अाली नाही. 

वाहतुकीबराेबरच कायदा अाणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पाेलिसांनी इंदू मिल, चैत्यभूमी या ठिकाणी चाेख बंदाेबस्त केलेला असल्याने लांबलचक रांगेत पाच ते सहा तास उभे राहूनही अभिवादन करण्यासाठी अनुयायांना अडचण येत नव्हती. शिवसेना भवनच्या परिसरात मेट्राेचे काम सुरू असल्यामुळे या भागातून चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्कच्या दिशेने वाट काढताना थाेडासा त्रास होत हाेता. या भागात थाेडीफार वाहतूक काेंडी झाली हाेती. समता सैनिक दलाचे कार्यकर्ते वाहतूक पाेलिसांना मदत करून वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने कसाेशीने प्रयत्न करीत हाेते. चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर प्रत्येकाची पावले इंदू मिलकडे वळत हाेती. इंदू मिलमध्ये अभिवादन केल्यानंतर मग प्रत्येक जण शिवाजी पार्कच्या दिशेने कूच करीत हाेता. थंडी, वारा, ऊन असतानाही काेणाच्याही चेहऱ्यावर थकवा नव्हता. कारण अापल्या महामानवाचे दर्शन मिळाल्याचा अानंद तमाम अनुयायांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत हाेता. 

 

शिवाजी पार्कवर भव्य मंच, सोनेरी रंगात बाबासाहेबांचा पुतळा 
चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेणे शक्य नसलेल्यांसाठी शिवाजी पार्कवर माेठ्या शामियानात दाेन भव्य एलसीडीवर चैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रम सुरू होते. मीनाताई ठाकरे प्रवेशद्वारावरून अात अाल्यावर डाव्या बाजूला भव्य बुद्धाची मूर्ती अाणि डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचा साेनेरी रंगातील उभा पुतळा मांडण्यात अाला हाेता. अांबेडकरप्रेमी हमखास येथे थांबून अापल्या माेबाइलमध्ये ही छबी कॅमेऱ्यात टिपण्यात अाणि सेल्फी काढण्यात रमून जात हाेते. 

 

वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड 
चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात बाबासाहेबांची फाेटाेफ्रेम, गळ्यातील लाॅकेट, अांबेडकर, गाैतम बुद्ध यांच्या प्रतिकृती खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली हाेती. मागील वर्षी अाेखी वादळामुळे फारशी विक्री झाली नव्हती, परंतु यंदा चांगला प्रतिसाद मिळाल्याने विक्रेते समाधानी हाेते. या खरेदीत विशेष करून निळ्या रंगाचे जॅकेट खरेदी करण्याचा कल जास्त दिसून अाला. 

 

राज्यपालांकडून अभिवादन 
राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी चैत्यभूमीला भेट देऊन डाॅ. अांबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. शिक्षणमंत्री विनाेद तावडे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर हेसुद्धा या वेळी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...