आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महापौर आपल्या दारी'मध्ये तक्रारींचा पडला पाऊस, दाैऱ्याप्रसंगी अधिकाऱ्यांना 7 दिवसांचा अल्टिमेटम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - सातपूर विभागातील प्रभाग २६ मध्ये 'महापौर आपल्या दारी' हा उपक्रम पार पडला. महापौर रंजना भानसी यांनी प्रभागातील विविध समस्या जाणून घेत नागरिकांशी संवाद साधला. 


यावेळी सभागृह नेते दिनकर पाटील, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, नगरसेविका अलका आहिरे, नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे व सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांनी परिसरातील मूलभूत समस्यांसह मोठ्या समस्याही निदर्शनास आणून दिल्या. या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात व त्याचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आदेश महापौर भानसी यांनी दिले. त्यांनी शिवशक्ती चौक, खुटवडनगर परिसर, चुंचाळे शिवार, सीटू भवनसमोरील परिसर, अष्टविनायकनगर, अंबड लिंकरोड, पाटील पार्क, आशीर्वादनगर गट नं. ११७, विराट संकुल, शिवाजी चौक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अंगणवाडी, सुप्रभातनगर, परेल पार्क आदी भागांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. 

 

नागरिक, नगरसेवकांनी वाचला तक्रारींचा पाढा... 
शिवशक्तीनगर भागातील नाल्यातून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी वाहते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढून आरेाग्यास धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची साफसफाई केल्यानंतर तो कचरा गोळा करून ठेवला जातो तो उचलला जात नाही. डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असून धूरफवारणी करण्याची मागणी करण्यात आली. पाण्याचा वॉल लिकेज असल्याने पाणीगळती सुरू असल्याचीही तक्रार अाहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे टाकले गेले अाहेत. खुटवडनगर, सीटू भवनसमोरील कॉलनी परिसरात पावसाळ्यात थेट घरात पाणी शिरते, या भागातील रस्त्यांची उंची वाढवावी, रस्ते काँक्रीट करावे तसेच अजिंक्य व्हिलेज परिसरात डासांचा प्रादुर्भाव असून रिकाम्या जागेतही कचरा साठला आहे. त्या परिसरातील रस्त्यांचे खडीकरण करावे. चुंचाळे शिवारात नव्याने अतिक्रमण वाढलेले असून त्या ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवावी. अष्टविनायकनगरमध्ये रस्ते करावे. अंबड लिंकरोड भागात अतिक्रमण वाढले असून पाटील पार्क पुलाजवळील रस्ता करण्यात यावा. त्या परिसरात वाळलेले झाड काढून घ्यावे. तेथील मोकळ्या जागेला असणारे कंपाउंड दुरुस्त करावे. आशीर्वादनगर गट नं. ११७ मध्ये रस्ते विकसित करावे. या परिसरासाठी स्वतंत्र जलकुंभ व जलवाहिन्यांची व्यवस्था करावी. विराट संकुल व नगर परिसरातील रस्त्यांचे खडीकरण करून डांबरीकरण करावे. त्याच परिसरातील जुनी धोकादायक विहीर बुजवावी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अंगणवाडी परिसरात अस्वच्छता आढळून आली, त्या ठिकाणच्या अंगणवाडीची दुरुस्ती करावी व परिसर स्वच्छ ठेवावा. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह असावे. संजीवनगरमधील उद्यानाकडे लक्ष घालावे. परेल पार्क परिसरातील वाइन शॉप बंद करण्याबाबत महिला रहिवाशांची मागणीही लक्षात घ्यावी. अशा अनेक समस्यांकडे नागरिकांनी महापाैरांचे लक्ष वेधले. 


प्रभागातील पाहणी दाैऱ्याप्रसंगी महापौरांना या आढळल्या प्रमुख समस्या... 
महापौर रंजना भानसी यांना दौरा करताना डासांचा प्रादुर्भाव, रस्त्यावर कचरा गोळा करून ठेवला जातो, नाल्यांची सफाई, सांडपाणी रस्त्यावर, धूूरफवारणी, नाल्यातील सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास, रस्त्यावर मातीचे ढिगारे, पाण्याची गळती, रस्ते खडीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण व अस्तरीकरण, चुंचाळे शिवार व अंबड लिंकरोड परिसरात वाढलेले अतिक्रमण, नव्या वसाहतींमध्ये पाणी, पथदीप, रस्ते आदी समस्या अाढळून अाल्या. नागरिक व नगरसेवकांनी या समस्यांकडे लक्ष वेधले. 


प्रभाग २६ येथे 'महापौर आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत प्रभागाच्या समस्या जाणून घेताना महापौर रंजना भानसी. समवेत सभागृहनेते दिनकर पाटील, नगरसेविका अलका आहिरे, नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे आदी. 

बातम्या आणखी आहेत...