आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Maharana Pratap Actor Faisal Khan Dating Model: Child Artist Faisal Buy Home And Two Luxurious Car By His Hard Work

रिअॅलिटी शोने बदलले ऑटो ड्रायव्हरच्या मुलाचे नशीब, घर घेतले, 2 लग्झरी गाड्याही आहेत उभ्या, पण आजही वडील चालवतात ऑटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर-2', 'झलक दिखला जा' या शोजमध्ये झळकलेला फैजल खान (19) सध्या त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. बातम्यांनुसार, फैजल याकाळात मॉडेल आणि जर्नलिस्ट मुस्कान कटारियाला डेट करत आहे. दोघे अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत. तर सोशल मीडियावरही दोघांचे एकत्र असलेले भरपूर फोटोज बघायला मिळत आहेत. अद्याप दोघांनी आपल्या रिलेशनशिपवर मौन बाळगले आहे. यापूर्वी फैजलेच नाव 'महाराणा प्रताप' या मालिकेतील त्याची को-स्टार असलेल्या रश्मी वालियासोबत जुळले होते. 2015 मध्ये फैजलने मुंबईत स्वतःचा फ्लॅट खरेदी केला. आता तो त्याच्या आईवडिलांसोबत या फ्लॅटमध्ये राहतो. मुंबईतील एका पॉश परिसरातील अपार्टमेंटच्या 15 व्या मजल्यावर फैजलचा फ्लॅट आहे. 


ऑटो ड्रायव्हरचा मुलगा आज आहे दोन लग्झरी गाड्यांचा मालक...

- डान्सर आणि अभिनेता असलेला फैजल मुंबईतील एका ऑटो ड्रायव्हरचा मुलगा आहे, पण आज त्याच्याजवळ स्वतःच्या दोन आलिशान कार आणि एक बाइक आहे. 
-  फैजल आजदेखील त्याच्या वडिलांच्या ऑटोने प्रवास करणे पसंत करतो. त्याचे वडील आता मुंबईतील एका ह्यूमन राइट्स ऑर्गनाइजेशनचे अध्यक्ष आहेत. पण तेदखील आपल्या मुलासाठी आजही ऑटो चालवणे पसंत करतात. 
 -divyamarathi.com सोबत बातचित करताना फैजल म्हणाला होता, "मी कितीही कार आणि बाइक खरेदी केल्या तरी माझ्यासाठी सर्वात जास्त मौल्यवान माझ्या वडिलांचा ऑटो आहे. मी आजसुद्धा त्याच ऑटोतून प्रवास करणे पसंत करतो. त्या ऑटोसोबत माझे भावनिक नाते जुळले आहे. माझे वडील आता इतरांसाठी ऑटो चालवत नाही. पण माझ्यासाठी ते आनंदाने तो चालवतात."
- फैजलने त्याचा अविस्मरणीय बर्थडेबद्दल सांगितले होते, "बालपणी मी माझ्या वडिलांजवळ एक सायकल मागितली होती. तेव्हा ते माझ्यासाठी सायकल खरेदी करु शकतील, अशी आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र तरीदेखील त्यांनी माझी ही इच्छा पूर्ण केली होती."

मुंबईत खरेदी केला स्वतःचा फ्लॅट
- 2015 मध्ये फैजलने मु्ंबईत स्वतःचा फ्लॅट खरेदी केला. येथे तो त्याच्या आईवडिलांसोबत वास्तव्याला आहे.
- त्याचा हा वन बीएचके फ्लॅट मुंबईतील एका पॉश परिसरातील अपार्टमेंटमध्ये 15व्या फ्लोअरवर आहे.

 

वयाच्या 14व्या वर्षी जिंकला डान्सिंग रिअॅलिटी शोचा किताब...
- फैजलने वयाच्या 14 व्या वर्षी पहिला डान्सिंग रिअॅलिटी शो आपल्या नावी केला होता. 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर 2' (2012)चा किताब त्याने जिंकला होता. त्यानंतर फैजलने मागे वळून पाहिले नाही.
- त्यानंतर फैजलने 'भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप'(2013-14) या ऐतिहासिक मालिकेत लीड रोल साकारला होता. त्यानंतर तो 'झलक दिखला जा 7' (2014) या डान्स रिअॅलिटी शोचा विजेता ठरला.
- फैजल अखेरचा 'डान्स चॅम्पिअन्स' या शोमध्ये दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...