आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी महाराणी जिंद कौर यांनी जोहर करण्यास दिला होता स्पष्ट नकार, त्यांच्या महागड्या हाराचा झाला लिलाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराजा रणजित सिंह यांची पत्नी महाराणी जिंद कौर यांच्या महागड्या हाराचा लिलाव झाला आहे. लंडन येथे हा लिलाव झाल्याचे समजते. जिंद कौर पंजाबचे महाराज रणजीत सिंह यांची पहिली पत्नी आणि शिखांची शेवटची महाराणी होती.

 

रणजित सिंह यांच्या मृत्यूपश्चात जिंद कौर यांनी जोहर करण्‍यास स्पष्ट नकार दिला होता. लंडनमध्ये जिंद कौर यांच्या नेकलेससाठी जवळपास पावणे दोन कोटी रुपयांची बोली लावली. लंडनमध्ये ऑक्शनियर बोनहॅमच्या इस्लामिक आणि इंडियन आर्ट सेलमध्ये हा हार विकला गेला. 

 

महाराणीच्या हाराचे वैशिष्ट्य 
महाराणीचा हा हार रत्न, मानक जडीत आहे. या हाराची किंमत जवळपास 80,000 ते 120,000 पौड होती. ब्रिटीशकालीन विविध वस्तूंच्या लिलावातून एकूण 1,818500 पौड  मिळाले.   

 

कोण होत्या महाराणी जिंद कौरबद्दल 

1839 मध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इतर राण्यांनी  जोहर केला होता परंतु जिंद कौर यांनी त्यावेळी  जोहर न करता पंजाबची गादी सांभाळण्याचा निर्णय घेतला होता. त्या महाराजा दिलीप सिंहांच्या मातोश्री होत्या. 1843 मध्ये, त्यांचा पाच वर्षीय मुलगा दिलीप सिंग नवीन राजा आणि त्यांना त्याचे संरक्षक म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु ब्रिटिशांनी पंजाबला ताब्यात घेण्यासाठी राणीला आपल्या मुलापासून वेगळे करून त्यांना कैद केले होते. 1863 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर हा हार ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांना भेट म्हणून देण्यात आला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...