आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पंतप्रधान मोदींच्या 9 तर अमित शाहांच्या 18 सभा होणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी अनेक पक्ष आपले स्टार प्रचारकांकडून प्रचार करणार आहेत. भाजपने निवडणुकीसाठी आपले कंबर कसले असून भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सभा घेणार आहेत. राज्यात पंतप्रधान मोदींच्या 9 सभा घेण्यात येणार आहेत. तर भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या 18 सभा आणि रॅली होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या 9 सभांपैकी 2 सभा 17 ऑक्टोबर रोजी पुणे आणि साताऱ्यात होणार आहे. 

पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात आलेले उदयनराजे भोसले पोटनिवडणूक लढवत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा किल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या सभा होणार आहेत.  

राज्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढले होते. 288 जागांपैकी भाजपने 122 तर शिवसेनेने 63 जागांवर विजय मिळवला होता.