आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3,277 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये होणार कैद; मतदानावर पावसाचे सावट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (21 ऑक्टोबर) रोजी मतदान पार पडत आहे. आजच्या मतदानावर पावसाचे सावट असले तरी या निवडणुकीतील चुरस पाहता विक्रमी मतदान होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. सर्वच जिल्हा प्रशासनांकडून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार असून 235 महिलांसह 3,277 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान पार पडणार आहे.

राज्यात 18 ते 25 वर्षे वयोगटातील 1,06,76,013 यांसह एकूण 8,98,39,600 मतदार आहेत. राज्यभरातील एकूण 96,661 मतदान केंद्रावर एकूण 6.5 लाख मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जवळपास 1,35,021 व्हीव्हीपॅट (मतदार सत्यापन पेपर ऑडिट ट्रेल) मशीन्स देखील बसविण्यात आली आहेत. 288 मतदारसंघांपैकी नांदेड-दक्षिण मतदारसंघात जास्तीत जास्त 38 उमेदवार रिंगणात आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये केवळ तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
 

आकडेवारी
> एकूण विधानसभा मतदारसंघ -288 
> महाराष्ट्रातील एकूण मतदार - 8,97,22,019
> एकूण मतदान केंद्रे - 96,661 

ईव्हीएम :
> बॅलेट युनिट - 1,79,895
> कंट्रोल युनिट - 1,26,505
> व्हीव्हीपॅट - 1,35,021
 
> एकूण उमेदवारांची संख्या - 3,237
> महिला उमेदवारांची संख्या - 235
> पुरुष उमेदवारांची संख्या - 3001 
> तृतीयपंथी उमेदवारांची संख्या - 01

> सर्वात जास्त मतदार - पनवेल - 5,54,827
> सर्वात कमी मतदार - वर्धा - 2,77,980
> सर्वात जास्त उमेदवार - नांदेड दक्षिण - 38
> सर्वात कमी उमेदवार - चिपळूण - 03