आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारराजाचा निर्धार : आज मतांची ‘अतिवृष्टी’ करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मत ईव्हीएमवर अन‌् मशीन बैलगाडीवर - Divya Marathi
मत ईव्हीएमवर अन‌् मशीन बैलगाडीवर

मुंबई, औरंगाबाद - विधानसभेसाठी आज राज्यात मतदान होणार आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनोत्तर पावसाने धुमाकूळ घातला आहे. मतदानादिवशी सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, तर राज्यात विक्रमी मतदानातून मतांची अतिवृष्टी होईल, असा उत्साह मतदारांत दिसत आहे.

कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी (६४.५ ते ११५.५ मिमी) होण्याची शक्यता आहे. राज्यात १९९५ च्या निवडणुकीत ७१.६९% अशी विक्रमी मतदानाची नोंद आहे. हा विक्रम मोडण्यासाठी मतदारराजा सज्ज झाला आहे. लोकशाहीच्या रंगमंचावर आज मतदार हाच नायक आहे. प्रत्येक मत निर्णायक ठरणार आहे. हे लक्षात घेऊन भरभरून मतदान करूया, नवा विक्रम घडवूया!

एकूण 3237 उमेदवार रिंगणात 
पुरुष उमेदवार : 3001
महिला उमेदवार : 235,
अन्य : 01
सर्वात कमी उमेदवार - नांदेड उत्तर : 3
सर्वाधिक उमेदवार - चिपळूण : 38
 

एकूण मतदार 8 कोटी 98 लाख 39,600 
> पुरुष मतदार : 4.68 कोटी 75,750
> महिला मतदार : 4.28 कोटी  43,635
 

पक्षनिहाय उमेदवारांची संख्या
> भाजप    164
> शिवसेना    126
> राष्ट्रवादी    121
> काँग्रेस    147
> बसप    262
> भाकप    16
> माकप    08
> मनसे    101
> इतर पक्ष    892
> अपक्ष    1400
 
 

१९९५ विधानसभा निवडणुकीत झाले होते विक्रमी मतदान
वर्ष    सरासरी मतदान
२०१४  :  ६३.०८%
२००९  :  ५९.५०%
१९९९  :  ६०.९५%
१९९५  :  ७१.६९%
१९९०  :  ६२.२६%
१९८५  :  ५९.१७%
१९८०  :  ५३.३०%
१९७८  :  ६७.५९%
१९७२  :  ६०.६३%
१९६७  :  ६४.८४%
१९६२  :  ६०.३६%
 

फेसबुक लाइव्ह केल्यास कारवाई
मतदानाच्या वेळी साेशल मीडिया लाइव्ह करण्याचे प्रकार २०१४ च्या निवडणुकीत घडले हाेते, त्यापैकी काही जणांवर गुन्हेही दाखल झाले हाेते. या वेळी मतदान करताना साेशल मीडियाचा गैरवापर टाळावा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बाेरीकर यांनी दिला आहे.

मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा
https://electoralsearch.in वर स्वतःची माहिती दिल्यास माहितीचा शोध घेता येतो. ती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय वा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळवण्याची दुसरी सुविधाही आहे.
 
 

मत ईव्हीएमवर अन‌् मशीन बैलगाडीवर

जळगाव - अमळनेर तालुक्यातील डांगरी व सात्री या दोन गावांतून बोरी नदी वाहते. महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्षे हाेत आली तरी गावांना जाेडणारा पूल अद्याप झालेला नाही. त्यामुळे दोन्ही गावांतून ये-जा करताना नदीपात्र ओलांडावे लागते. सात्री येथील मतदान केंद्रावर डांगरी येथून ईव्हीएम व इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना चक्क बैलगाडीचा वापर करावा लागला. निवडणूक निर्णय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, कृषी अधिकारी भरत अहिरे यांनी आधी बैलगाडीतून नदी पार केली. 

बातम्या आणखी आहेत...