आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएए, एनआरसीविरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद, 3000 पेक्षा अधिक जण ताब्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीने शु्क्रवारी महाराष्ट्र बंद पुकारला. या बंदला ठिक-ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा सुद्धा निषेध केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामध्ये दिवसभरात विविध परिसरातून 3 हजार पेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

व्हीबीएचे राज्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 पेक्षा अधिक संघटनांनी महाराष्ट्र बंदला समर्थन दिले आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, पुण्यात या आंदोलनादरम्यान हिंसक वळणही लागले. यामध्ये दत्तवाडी आणि कोथरूड परिसरात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. चेंबूजवळ राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सुद्धा फोडण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारची तोडफोड औरंगाबादमध्ये सुद्धा दिसून आली आहे. मोकळे यांनी दावा केला, की बंद पाळण्यात आला तरीही महत्वाच्या ठिकाणी वाहतूक अडवली जाणार नाही. देशभर मोदी सरकारकडून एनआरसी आणि सीएए लागू करण्याची बळजबरी केली जात आहे. त्यालाच विरोध करताना हा बंद पाळण्यात येत असल्याचे ते पुढे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...