आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचे सरकार केवळ नावापुरते महाविकास नाही, राज्याचा महाविकास कसा होईल या दृष्टीने काम करतेय - मुख्यमंत्री

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील आर्थिक मंदी, कोरोना यांसारख्या अडचणींत अर्थसंकल्प सादर करणे आव्हानात्मक
  • पेट्रोल-डिझेल दरवाढीवर उद्धव ठाकरे म्हणाले - राज्यातील जनता सांभाळून घेईल

मुंबई - अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. आमचे सरकार केवळ नावापुरते महाविकास आघाडी सरकार नाही. राज्याचा महाविकास कसा होईल या दृष्टीने पावले टाकत आहेत. देशातील आर्थिक मंदी, कोरोना यांसारख्या संकटात अर्थसंकल्प सादर करणे आव्हानात्मक होते. या अर्थसंकल्पात सगळ्याच घटकांचा विचार करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षात आपले देशात आणखी पुढे नेऊ. 

मुख्यमंत्री म्हणाले की, 2 लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ अशी नागपूर अधिवेशनात घोषणा केली होती. ती आता पूर्णत्वास येत आहे. 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट प्रमाणे योजना आणणार आहोत. पेट्रोल-डिझेल दर वाढीवर उद्धव ठाकरे म्हणाले


पेट्रोल आणि डिझेलवरचा अतिरिक्त कर वाढवण्यात आला. सगळं सांभाळून घेताना एवढं करावं लागतं. महाराष्ट्राची जनता आम्हाला समजून घेईल, मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले योजनेची फक्त घोषणाच नाही तर ती लागू केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला अर्थसंकल्प 


महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केला. यावेळी शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारासाठी सरकारने कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. तर वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावरही सरकारचा भर असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले. 

 

बातम्या आणखी आहेत...