आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना हेलपाटे न घालता कर्जमुक्ती दिली - अर्थमंत्री अजित पवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारचा पहिला आर्थिक पाहणी अहवाल सादर केला
  • आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याचा विकास दर 5.7 टक्के राहण्याचा अंदाज

मुंबई - महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. विधीमंडळात सकाळी 11 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. यापुर्वी गुरुवारी अजित पवार यांनी विधानपरिषदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. मागील वेळेच्या तुलनेत यावेळी 57 हजार कोटींच्या महसुली तोटाचा बोजा पडला आहे. शेतकरी कर्जमाफी, सरकारी योजनांवरील बंदी यासह विविध विषयांवर भाजप सरकरला घेरण्याचा प्रयत्न करू शकेल. 

पहिल्यांदाच सकाळी 11 वाजता सादर होणार अर्थसंकल्प


आतापर्यंत विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर होत होता. मात्र यावेळी पहिल्यांदाच सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर नवीन परंपरा महाविकास आघाडी सुरू करणार आहे. आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 7 मार्च ते 10 मार्चपर्यंत विधानसभा बंद राहणार आहे. 

विकास दर 5.7 टक्के राहण्याचा अंदाज 

अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सरकारचा पहिला आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर केला. यानुसार यावर्षी महाराष्ट्राचा विकास दर 5.7 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्यावर्षी राज्याचा विकास दर 7.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. याबरोबरच कृषी व संलग्न काम क्षेत्रात 3.1 टक्के, उद्योगा 3.3 टक्के आणि सेवा क्षेत्रात 7.6 टक्के वाढीचा अंदाज राज्याच्या आर्थिक आढावा अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.