आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबई आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पुण्यासाठी सरकारच्या विशेष घोषणा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वरळीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटन भवनाची स्थापना होईल

मुंबई/पुणे- राज्यातील महाविकासआघाडी सरकारकडून आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा प्रभाव दिसला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या पुणे आणि शिवसेनेचा प्रभाव असलेल्या मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी केलेल्या योजनांची घोषणा केली. यात सर्वात मोठी घोषणा आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघासाठी झाली आहे. आदित्या ठाकरेंच्या मतदारसंघात आगामी काळात 1 हजार कोटींच्या पर्यटन भवनाची स्थापना होणार आहे.

मेट्रोचे काम लवकर होईल- अजित पवार


तसेच, अजित पवारांनी आगामी काळात पुण्यातील मेट्रोच्या विस्तारावरही भाष्य केले. ते म्हणाले की, स्वारगेट ते कात्रजदरम्यान मेट्रोचे काम केले जाईल. यासाठी आधीच्या सरकारने केलेल्या रकमेपेक्षा जास्तीची तरतूद केली जाईल. यासोबतच पुण्यातील बालेवाडी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय स्टेडियम बनवण्यासाठी सरकार वेगळा फंड देईल. येथे आंतरराष्ट्रीय स्टोर्ट्स यूनिवर्सिटीची स्थापनादेखील होईळ. यात कबड्डी, कुश्ती, खो-खो, व्हॉलीबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतल्या जातील. पुण्यात पुढील 2 वर्षांसाठी स्टँप ड्यूटीवर 1 टक्क्यांची सुट करण्यात आली आहे. तसेच, पुण्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवसाठी 4 कोटी रुपयांची घोषणा झाली आहे.

मुंबईसाठी सरकारची घोषणा


आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात सरकार आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटन भवन निर्माण करणार आहे. यासाठी तब्बल 1 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. नवी मुंबईमद्ये महाराष्ट्र भवन आणि मुंबईमध्ये मराठी भाषणा भवनाचीदेखील स्थापना होईळ. मुंबईत माल आणि सेवा केंद्राची स्थापना होईल, यासाठी सरकार 148 कोटी रुपये खर्च करेल. तसेच, हाजी अली परिसराच्या विकासावर 10 कोटी रुपये खर्च केले जातील. मुंबई-बँगळुरू कॉरिडोरसाठी 4000 कोटींचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...