आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीसह नियमित कर्ज भरणाऱ्यांचाही विचार, राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. केवळ कर्जमाफी नव्हे, तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे अजित पवार म्हणाले आहेत. पर्यटनासाठी सरकार 1400 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल उभारले जाईल. सोबतच, रोजगारासाठी मुंबईला येणाऱ्या राज्यभरातील युवकांसाठी भवन तयार केले जाणार आहे. यासोबतच, वडाळा येथे वस्तू आणि सेवा कर भवन बांधले जाणार असल्याचे यावेळी सरकारच्या वतीने सांगण्यात आले. याबरोबरच, राज्य सरकारने पेट्रोल आणि डीझेलवर नवीन कर लागू केले. त्यानुसार, राज्यात इंधनाचे दर किमान एका रुपयाने वाढणार आहेत. तरीही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना इंधनावर केंद्र सरकारचेच कर जास्त असल्याचे म्हणत अजित पवारांनी आपल्या निर्णयाचा बचाव केला.

नियमित कर्ज भरणाऱ्यांना देखील दिलासा

पत्रकार परिषदेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले, कर्जमाफीचा फायदा केवळ कर्ज नाही भरलेल्या शेतकऱ्यांनाच झाला नाही. तर जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांना देखील होईल. यापूर्वी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांचे इंसेन्टिव्ह दिले जाणार आहे. सरकारने केवळ कर्जमाफीच नाही, तर कर्ज नियमित भरणाऱ्यांचा देखील विचार केला असा पुनरुच्चार अजित पवारांनी केला.

यासोबतच, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना महाविकास आघाडी सरकारने अडचणीच्या काळात सुद्धा हा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सर्वांचा विचार करण्यात आला आहे. शिक्षण, रोजगार, शेतकरी आणि सामान्य नागरिकांसह उद्योजकांचा देखील यामध्ये विचार करण्यात आला. शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी देण्यात आली नाही. तर ज्यांनी नियमित कर्ज भरला त्यांना देखील दिलासा दिला. राज्य सरकारने इंधनावरील कर वाढवल्याने पेट्रोल आणि डीझेलचे भाव राज्यात एका रुपयाने वाढणार आहेत. त्यावर स्पष्टीकरण देताना अजुनही राज्य सरकारचे इंधनावरील कर केंद्र सरकारच्या तुलनेत कमीच आहेत. त्यामुळे, केंद्र सरकारनेच हे कर कमी करावे असे अर्थमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...