आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्र्यांचे भाषण ऐकले, अनेक घोषणा केंद्र सरकारच्या जोरावर, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा राज्य सरकारला विसर - देवेंद्र फडणवीस
  • सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या 'त्या' वचनाचा भंग केला

मुंबई - माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. सभेत अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्र्यांचे जाहीर भाषण ऐकले, असे फडणवीस म्हणाले. ''हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वल पोकळ भाषण, त्याव्यतिरिक्त काहीच नाही. पहिल्यांदाच अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये केवळ भाषण होते, कोणतीही आकडेवारी नव्हती. आर्थिक स्थितीबाबत कसलंही विश्लेषण नव्हते. मागील वर्षाचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स नव्हता. ज्यासाठी आर्थसंकल्प मांडतात, तेच यात नव्हते.'' असे फडणवीस म्हणाले. 

सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या 'त्या' वचनाचा भंग केला 


फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. कर्जमाफीची घोषणा करत असताना मुदत कर्जाबाबत कोणतीही घोषणा केली नाही. पीककर्जाव्यतिरिक्त इतर कोणतेही कर्ज माफ झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी बांधावार जाऊन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र त्या वचनाचा भंग करून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना एक नवा पैसाही दिला नाही. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक घोषणा केंद्र सरकारच्या जोरावर


दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी अतिशय महत्वाकांक्षी 2000 कोटींची गरज असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडला 200 कोटींचा निधी दिला. अनेक घोषणा केंद्र सरकारच्या जोरावर केल्या आहेत. घराघरात नळ ही केंद्र सरकारची योजना आहे. आमच्या सरकारच्या काळात 2 लाख 68 हजार कोटींचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरु झाले आहेत. पुणे रिंग रोडससह राज्यातील रस्ते विकासासाठी नितीन गडकरी पैसा देणार. सौरपंप योजना केंद्र सरकारची. केंद्र सरकार वाटप करत असलेल्या सौरपंपाचा काही वाटा राज्याला मिळणार. त्यातून हे वापट करणार आहे. 10 लाख तरुणांना रोजगार नाही तर प्रशिक्षण मिळणार. यामुळे तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न कायम राहतो, असेही फडणवीस म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...