आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पहिल्यांदाच पर्यटनासाठी 1400 कोटींची तरतूद, पाचगणी आणि महाबळेश्वरसाठी 100 कोटी राखीव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरळीत उभारणार 1 हजार कोटींचे पर्यटन संकुल

मुंबई- राज्यात महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला. अजित पवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच पर्टन विभागासाठी तब्बल 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

सरकारने यावेळेस सर्वच विभागाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. पायाभूत सुविधांपासून रोजगार निर्मिती, तरुणांना रोजगार मिळण्यासाठी कायदा, रस्ते विकासाबरोबरच पर्यटन व्यवसाय वाढीला लागण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. या वेळेस पर्टनावर सरकार 1400 कोटी रुपये खर्च करणार आहे. यात देशविदेशतील पर्टकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईमधील पर्टनावर 100 कोटी खर्च होणार आहेत. तसेच, मुंबईतील हाजी अली परिसराच्या विकासासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीसाठी 100 कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत.


पर्यटन संकुलासाठी 1 हजार कोटींची तरत
ूद


राज्य सरकार पर्टनासाठी वरळीत आंतरराष्टीर दर्जाच्या पर्यटन संकुलाची निर्मिती करणार आहे. यासाठी राज्य सरकारने 1 हजार कोटी रुपये मंजुर केले आहेत. यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालयदेखील असेल. पर्टनासोबतच पर्यावरण विभागासाठीही महत्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. सादर झालेल्या अर्थसंकल्पात पर्यावरणासाठी 230 कोटी रुपये मंजुर झाले आहेत. याव्यतिरीक्त ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज या गंभीर समस्यांसाठी विशेष तरतूदी करण्यात येतील. यासोबतच नदी प्रदुषण प्रकल्पाच्या अनुषंगाने नाग, इंद्रायणी, वालधुनी या नद्यांमध्ये या नदयांमध्ये सोडण्यात येणारे सांडपामी अडवणे आणि त्यावर प्रक्रिया करणारे केंद्र स्थापन होणार आहे.बातम्या आणखी आहेत...