Home | Maharashtra | Mumbai | Maharashtra cabinet expansion 13 MLA took oath of minister

राजभवनात पार पडला मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा, 13 नवीन चेहऱ्यांना संधी तर भाजपच्या काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 16, 2019, 11:44 AM IST

राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांची कॅबिनेटपदी वर्णी, 13 आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ  

 • Maharashtra cabinet expansion 13 MLA took oath of minister

  मुंबई - होणार-होणार म्हणत अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुहूर्त सापडला आणि रविवारी सकाळी ११ वाजता राजभवन येथे नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला पार पडला. विशेषतः आयात केलेल्या आमदारांना यावेळी संधी देण्यात आली आहे.

  भाजपच्या या विद्यामान मंत्र्यांना मिळाला डच्चू
  मंत्रिमंडळ विस्तारात 13 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर दोघांचीही कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे, सुरेश खाडे, बाळा भेगडे, परिणय फुके यांना संधी देण्यात आली आहे. तर आदिवासी मंत्री विष्णू सावरा, दिलीप कांबळे, राजकुमार बडोले या मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे.

  राज्य मंत्रिमंडळात या नवीन मंत्र्यांनी घेतली शपथ

  1. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) संभावित कॅबिनेट
  2. डॉ. संजय कुटे (भाजप) संभावित राज्यमंत्री
  3. सुरेश खाडे (भाजप) संभावित कॅबिनेट
  4. योगेश सागर (भाजप) संभावित राज्यमंत्री
  5. डॉ. अनिल बोंडे (भाजप) संभावित राज्यमंत्री
  6. अतुल सावे (भाजप) संभावित राज्यमंत्री
  7. जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) संभावित कॅबिनेट
  8. आशिष शेलार (भाजप) संभावित कॅबिनेट
  9. तानाजी सावंत (शिवसेना) संभावित राज्यमंत्री
  10. परिणय फुके (भाजप) संभावित राज्यमंत्री
  11. अविनाश महातेकर (रिपाइं) संभावित राज्यमंत्री
  12. बाळा भेगडे (भाजप) संभावित राज्यमंत्री
  13. अशोक ऊईके (भाजप) संभावित राज्यमंत्री

Trending