Maharashtra Cabinet / मंत्रीमंडळात फेरबदल; पुण्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटलांकडे तर तावडेंकडे संसदीय कामकाज, राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती


आरोपानंतर खडसेंनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला होता

दिव्य मराठी वेब

दिव्य मराठी वेब

Jun 07,2019 04:42:00 PM IST

मुंबई- महाराष्ट्रात दुष्काळाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. यातच यावर्षीही पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांना पुढे काय करावे कळत नाहीये. याच पार्श्वभूमीवर आज राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी कृषी अधिकारी, सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि सर्व मंत्री उपस्थित होते.


या बैठीकत मुख्यमंत्री म्हणाले, "मागच्या वर्षी राज्यात 73 % पाऊस पडूनही उत्पादकता वाढली आहे. मराठवाड्यात 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडूनही वाढती उत्पादकता ही समाधानाची बाब आहे. 2009 ते 2014 या काळातल्या गुंतवणुकीची तुलना मागील पाच वर्षांशी केली तर ती चौपट झाली." तसेच कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


या वर्षी पाऊसाचे आगमन उशिराने होणार आहे, म्हणून पेरण्या उशिरा कराव्या त्यासाठी मागील 3 दिवसांत 5 कोटी SMS शेतकऱ्यांना पाठवले असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. तसेच मागच्या वर्षी फक्त 73 % पाऊस पडला पण आपली उत्पादकता वाढत आहे. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


2012 -13 मध्ये जास्त पाऊस पडला होता त्यावेळी 128 लाख मेट्रिक टन एवढी उत्पादकता झाली आहे. 2013-14 मध्ये कमी पाऊस पडल्यामुळे 70 लाख मेट्रिक टन एवढी उत्पादकता झाली होती. तसेच मागील वर्षी 115 लाख मेट्रिकटन उत्पादकता या वर्षी झाली आहे. मागील 5 वर्षात शेतीत 4 पटीने गुंतवणूक सरकारने केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


जळगावच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
यावेळी राज्यातील मंत्रिमंडळावरदेखील चर्चा करण्यात आली. यात पुण्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे, तर जळगावचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच गिरीष बापट यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री पद हे जय कुमार रावल यांच्याकडे दिले आहे, तर संसदीय कामकाज मंत्रीपद विनोद तावडे यांच्याकडे दिले असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.


आरोपानंतर खडसेंनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला होता
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या पूर्वी त्यांचाकडे नाशिक जिल्हाचे पालकमंत्री पद होते, पण आता त्यांच्यावर जळगावचाही पदभार सोपवण्यात आला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे जळगावचे पालकमंत्री होते. त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर खडसेंनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे जळगावचे पालक मंत्री होते.

जळगाव सोबतच कोल्हापूरचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्याकडे असल्याने जळगावमध्ये नियोजन बैठकीला त्यांची उपस्थिती कमी असायची, त्यामुळे जिल्ह्याची विकास कामे संथ गतीने सुरू असल्याचा आरोप विरोधक करायचे. आता स्थानिक पालकमंत्री जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळेल असे नागरिकांनी मत मांडले आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर सोबतच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.

X
COMMENT