आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॉमिनेशन लिस्ट जाहीर, 'खारी बिस्किट' चित्रपटाला सर्वाधिक 9 कॅटेगरीत नॉमिनेशन 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'  पुरस्कारांची व नामांकनांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यंदा हा सोहळा 11व्या वर्षात पदार्पण करत आहे. 11 विविध श्रेणींमधील पुरस्कार 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019'मध्ये देण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने 'फेवरेट चित्रपट', 'फेवरेट अभिनेता', 'फेवरेट अभिनेत्री', 'फेवरेट स्टाईल आयकॉन', 'फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर'' 'फेवरेट गीत' या अवॉर्ड्सचा समावेश असणार आहे.  

या चित्रपटाला आहे सर्वाधिक नामांकने
या सोहळ्यात संजय जाधव यांच्या 'खारी बिस्किट' या चित्रपटाला एक दोन नव्हे तर तब्बल 9 कॅटेगरीत नामांकनं मिळाली आहेत. 'खारी बिस्कीट' सिनेमाला ‘फेवरेट चित्रपट’ तसेच संजय जाधव यांना ‘फेवरेट दिग्दर्शक’ यासाठी नामांकन मिळाले आहे. अभिनेता संजय नार्वेकर आणि अभिनेत्री नंदिता धुरी-पाटकर यांना अनुक्रमे ‘फेवरेट सहाय्यक अभिनेता’ आणि ‘फेवरेट सहाय्यक अभिनेत्री’ ही नामांकने आहेत. तर या सिनेमातील ‘तुला जपणार आहे’, आणि ‘खारी’ या दोन्ही गाण्यांना ‘फेवरेट गीत’ गटात नामांकने मिळाली आहेत. ‘फेवरेट गायक’ म्हणून कुणाल गांजावाला (खारी) आणि आदर्श शिंदे (तुला जपणार आहे) तसेच गायिका रोंकिनी गुप्ताला (तुला जपणार आहे) गाण्यासाठी फेवरेट गायिका म्हणून नामांकन मिळालं आहे. अशा पध्दतीने खारी बिस्कीट सिनेमाला सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत.  


अशी आहे नॉमिनेश लिस्ट 

  • फेवरेट चित्रपट या कॅटेगरीत आनंदी गोपाळ, टकाटक, ट्रिपलसीट, हिरकणी, ये रे ये रे पैसा २, खारी बिस्कीट, फत्तेशिकस्त या चित्रपटांना नामांकने मिळालेली आहेत. विविध धाटणीचे दर्जेदार चित्रपट नामांकित ठरलेले असल्याने या स्पर्धेतील चुरस मोठी असणार आहे.

  • 'फेवरेट अभिनेता' आणि 'फेवरेट अभिनेत्री' होण्यासाठीची स्पर्धा सुद्धा कलाकारांसाठी सोपी नाही. अभिनेता ललित प्रभाकर याला 'आंनदी गोपाळ'मधील अभिनयासाठी नामांकन मिळालेले आहे. 'ये रे ये रे पैसा २'मधील संजय नार्वेकर, तर 'मोगरा फुलला'मधील स्वप्नील जोशी आणि 'ट्रिपलसीट' सिनेमातील अंकुश चौधरी या चॉकलेट हिरोंनादेखील आपल्या अभिनयासाठी नामांकित करण्यात आलेले आहे. याशिवाय प्रथमेश परब यानेही आपल्या 'टकाटक' सिनेमातील अभिनयाच्या जोरावर नामांकन मिळवलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक अष्टपैलू कलाकार चिन्मय मांडलेकर याने 'फत्तेशिकस्त'मधून आपल्या अभिनयाने छाप पाडून नामांकन मिळवलेले आहे.

  • 'हिरकणी' सिनेमात मुख्य भूमिका केलेली सोनाली कुलकर्णी, 'बंदिशाळा'मधील मुक्त बर्वे, 'ट्रिपलसीट'मधील शिवानी सुर्वे, यांना 'फेवरेट अभिनेत्री'च्या श्रेणीत नामांकन मिळालेले आहे. अष्टपैलू अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने सुद्धा 'फत्तेशिकस्त' या सिनेमासाठी नामांकन मिळवलेले आहे. याशिवाय, 'आनंदी गोपाळ'मधील भाग्यश्री मिलिंद आणि 'टकाटक'मधील रितिका श्रोत्री या अभिनेत्री सुद्धा दिग्गजांना 'टफ फाईट' देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

  • 'खारी बिस्कीट'मधील 'तुला जपणार आहे' व 'खारी', 'हिरकणी'मधील 'शिवराज्याभिषेक', 'आनंदी गोपाळ'मधील 'रंग माळियेला' आणि 'फत्तेशिकस्त'मधील 'तू जोगवा वाढ माई' व 'रणी फडकती लाखो झेंडे' या गाण्यांनी प्रेक्षकांवर गारुड घातले आहे. प्रेक्षकांची आवडती गाणी ठरू लागलेल्या या गीतांमधून 'फेवरेट गीत' होण्याचा मान कोण मिळवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

  • या पुरस्कार सोहळ्यात, 'फेवरेट स्टाईल आयकॉन' आणि 'पॉप्युलर फेस' हे दोन पुरस्कार सुद्धा अत्यंत मानाचे ठरणार आहेत. हँडसम आणि तरुणींचे लाडके अभिनेते, अंकुश चौधरी, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, स्वप्नील जोशी आणि आकाश ठोसर 'फेवरेट स्टाईल आयकॉन' होण्यासाठी नामांकित करण्यात आलेले आहेत.

  • असंख्य तरुणांच्या दिलाची धडकन असणाऱ्या अभिनेत्री, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, वैदेही परशुरामी, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, अमृता खानविलकर या वर्षातील 'पॉप्युलर फेस' होण्यासाठी स्पर्धा करत असलेल्या पाहायला मिळतील.

  • 'फेवरेट दिग्दर्शक', 'फेवरेट गायक', 'फेवरेट गायिका', 'फेवरेट सहाय्यक अभिनेता', 'फेवरेट सहाय्यक अभिनेत्री' या श्रेणीमधील नामांकने सुद्धा 'झी टॉकीज'च्या साईटवर प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या कलाकारांना विजयी करणे सुद्धा सर्वस्वी प्रेक्षकांच्या हातात असणार आहे. साईटवर आपल्या लाडक्या कलाकारांना वोट देऊन, प्रेक्षक विजयी करू शकतात.
बातम्या आणखी आहेत...