Politics / Video: विरोधी पक्षांची अवस्था वर्ल्ड कप हारलेल्या टीमसारखी जी अम्पायरलाच दोष देते! विरोधकांच्या ईव्हीएम रॅलीवर मुख्यमंत्री

वर्ध्यात विरोधकांच्या ईव्हीएम रॅलीवर बरसले मुख्यमंत्री, हारलेल्या टीमसोबत केली तुलना

दिव्य मराठी

Aug 02,2019 03:11:00 PM IST

वर्धा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथे महाजनादेश रॅलीला संबोधित केले. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने विरोधकांच्या ईव्हीएम रॅलीचा खरपूस समाचार घेतला. सर्वच विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन ईव्हीएम विरोधात 21 तारखेला रॅली काढण्याचे जाहीर केले. या विरोधी पक्षांची अवस्था वर्ल्डकपच्या हारलेल्या टीमसारखी आहे. अशी टीम ज्याने वर्ल्डकपमध्ये अतिशय वाईट प्रदर्शन केले. शेवटच्या क्रमांकावर आल्यानंतर त्या टीमचा कर्णधार म्हणतो, की अम्पायर आमच्या बाजूचा नव्हता, नाही तर वर्ल्ड कप जिंकणारच होतो.

X