आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन वर्षे शिफारशींकडे दुर्लक्ष, ५० काेटींचा फंड गमावला; १५ दिवसांपूर्वी साक्षात्कार, ऐनवेळी निवडणुकीचा निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमसीएच्या पुणे येथील मैदानावर १० ऑक्टाेबरपासून भारत-द. आफ्रिका कसाेटी. - Divya Marathi
एमसीएच्या पुणे येथील मैदानावर १० ऑक्टाेबरपासून भारत-द. आफ्रिका कसाेटी.

एकनाथ पाठक 

औरंगाबाद - लाेढा समितीने सुचवलेल्या शिफारशींकडे  दुर्लक्ष करणे आणि याबाबत असलेली अनुत्सुकता ही महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनला (एमसीए) चांगलीच महागात पडली.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी एमसीएला गत दाेन वर्षांपासून फंड दिला नाही. त्यामुळे दरवर्षी मिळणारा २५ काेटींचा फंड एमसीएला गमवावा लागला. याचा संघटनेला माेठा फटका बसला. 

एमसीएला  गत दाेन वर्षांपासून हाेत असलेल्या नुुकसानीचा आणि समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबतचा साक्षात्कार दाेन आठवड्यांपूर्वी झाला. यासाठी गत महिन्यात पुणे येथे बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. याच बैठकीमध्ये  शिफारशींबाबत सकारात्मक निर्णय घेऊन एमसीएने निवडणुकीची तयारी दर्शवली. येत्या २ आॅक्टाेबर राेजी ही निवडणूक हाेण्याचे चित्र आहे. मंडळानेही या संघटनेच्या घटनेला मंुजरी दिली.  
 

राज्यात निवडणूक; मुंबईला आयुक्त मिळेना!
विधानसभेच्या निवडणुका येत्या २१ आॅक्टाेबरला महाराष्ट्रामध्ये हाेणार आहे. त्यामुळे निवडणूक विभाग यासाठी व्यग्र आहे. यामुळेच मुंबई क्रिकेट असाेसिएशनला (एमसीए) आपल्या निवडणुकीसाठी आयुक्त मिळत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे एमसीएच्या निवडणुकीचे आयाेजन अधांतरी झाले आहे. मात्र, बीसीसीआयच्या सीईआेने या निवडणुकांमध्ये लवकर निर्णय घेण्याचे लेखी आदेशही दिले आहेत. यातूनच आता  मुंबई क्रिकेट संघटनेला यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे. घटनेतील बदलही मंडळाने मान्य केलेला आहे.

येत्या ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया, मतदान बुधवारी हाेणार
मंडळाने  राज्यांना आपल्या अंतर्गत निवडणुका लवकर घेण्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशननेही याबाबत तयारी दाखवली. यासाठी बुधवार, २५ सप्टेंबर राेजी निवडणूक आयुक्त म्हणून सहारिया यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी तातडीने या निवडणुकीबाबतचे पत्र पाठवले. येत्या २ आॅक्टाेबर राेजी एजीएममध्ये ही निवडणूक घेण्याचे सुचवले आहे. मात्र, चार दिवसांत यासाठी माेठी धावपळ हाेणार आहे. अद्याप याच्या रिंगणात उतरणाऱ्या  उमेदवारांची नावेही निश्चित झालेली नाहीत. शनिवारी मतदारांची फायनल लिस्ट, रविवारी नाॅमिनेशन फाॅर्म  भरणे आणि साेमवारी अर्जाची छाननी हाेईल.  
 

दाेन वर्षांपासून आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा हाेईना

​​​​​​महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनने लाेढा समितीच्या शिफारशी मंजूर करण्याबाबत अनुत्सुकता दाखवली. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) दरवर्षी राज्य संघटना अंतर्गत स्पर्धांच्या आयाेजनासाठी  दिला जाणारा फंड एमसीएलला मिळाला नाही.  यासाठी प्रत्येक वर्षी २५ काेटींचा  फंड दिला जाताे. मात्र, दाेन वर्षांपासून हा  फंड एमसीएला मिळाला नाही. त्यामुळे एमसीएने मागील दाेन वर्षांपासून २०१७-१८ आणि २०१८-१९ च्या सत्रातील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेचे आयाेजन केले नाही.  याच फंडाअभावी  महिलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या आयाेजनाबाबतही अनुत्सुकता आहे. याचा २१  जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंवर परिणाम पडत असल्याची प्रतिक्रिया एका सदस्याने दिली.