आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुवाहाटी - काेल्हापूरच्या युवा सायकलपटू पूजा दानाेळेने अापला दबदबा कायम ठेवताना तिसऱ्या सत्राच्या खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये सुवर्णपदकाचा डबल धमाका उडवला. तिने सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. काेल्हापूरच्या या युवा खेळाडूने महिलांच्या रोड रेस प्रकारात साेनेरी यशाचा पल्ला गाठला. युवा नेमबाज रुद्रांश पाटीलने सुवर्णपदकाचा वेध घेतला.
दुसरीकडे पुण्याच्या क्रीडा प्रबाेधिनीच्या सिद्धेश पाटीलने पुरुष गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्याने पदार्पणात उल्लेखनीय कामगिरी करताना घवघवीत यश संपादन केले. तसेच हाॅकीमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने साेमवारी झारखंडवर १-० ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली.
१७ वर्षांखालील गटात रोड रेसमध्ये पूजा दानोळेने मुलींच्या ३० किमी शर्यतीत अनुभवाच्या जोरावर वर्चस्व राखले. अखेरच्या एक किमी अंतरावर ती स्पर्धकांमधून पुढे आली आणि अखेरच्या शंभर मीटरला तिने वेग वाढवताना थाटात अंतिम रेषा गाठली. तिने ताशी ३५ किमी वेगाने सायकलिंग करताना ५५ मिनीट ४२.३२ सेकंद अशी वेळ दिली. तिने गुजरातच्या मुस्कान गुप्ताला (५५ मिनिट ४२.४७ सेकंद) दशांश पंधरा सेकंदांनी मागे टाकले.
सिद्धेशला कांस्यपदक : पुुरुषांच्या ५० किमी अंतराच्या पाच टप्प्याच्या शर्यतीत ताशी ४० ते ४५ किमी वेग राखला होता. यात दिल्लीच्या अर्शद फरिदी याने (१ तास ९ मिनिट ३६.२५ सेकंद) सहज बाजी मारली. त्याच्यानंतर हरियाणाच्या रवी सिंगने १ तास ९ मिनिट ३६.४३ सेकंद वेळ नाेंदवत रौप्यपदक पटकावले. मात्र, (१ तास ९ मिनिट ३६.४९ सेकंद) दशांश सहा सेकंदाने मागे राहिल्याने त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
हॉकी : अंकिताचा विजयी गाेल; महाराष्ट्राची झारखंडवर मात
अंकिता सपाटेच्या सुरेख गोलच्या जोरावर महाराष्ट्राने बलाढ्य झारखंडवर १-० असा निसटता विजय नोंदवत २१ वर्षांखालील मुलींच्या गटात शानदार सलामी केली.
जिम्नॅस्टिक : अदितीला सुवर्ण
जिम्नॅस्टिकमध्ये आदिती दांडेकर हिने तालबद्धच्या (रिदमिक) वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात ५२.९५ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात रिचा चोरडिया ४७ गुणांसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात कलात्मकच्या फ्लोअर एक्सरसाईजमध्ये अनस शेख याने १२.१० गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली.
युवा गटात ठरला चॅम्पियन
१७ वर्षांखालील १० मी. एअर रायफल गटात ठाण्याचा रुद्रांश पाटील चॅम्पियन ठरला. २१ वर्षांखालील गटात कोल्हापूरच्या शाहू माने याने कांस्यपदक पटकावले. रुद्रांशने ६२७.२ गुणांनी अव्वल क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. त्यानंतर अंतिम फेरीतही सातत्य राखताना २५२.४ गुणांनी त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच दबदबा कायम ठेवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.