आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात लागू होणार दिल्लीतील शाळांचा शैक्षणिक फॉर्मुला; केजरीवालांनीही केले अभिनंदनाचे ट्विट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - महाराष्ट्र सरकार सुद्धा शिक्षणाचा दर्जा सुधरवण्यासाठी दिल्ली स्कूलचा फॉर्मुला वापरणार आहे. हे दिल्ली मॉडेल राज्यातील महापालिका अंतर्गत चालणाऱ्या शाळांमध्ये वापरले जाईल असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आहे. दी इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सोमवारी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली. त्याच बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. हा फॉर्म्युला मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबईत लागू केला जाईल.

अजित पवार पुढे म्हणाले, "दिल्लीचे शैक्षणिक मॉडेल आर्थिक व्यवस्थापनासह शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सुद्धा फायद्याचे आहे. महाराष्ट्र सरकार शिक्षणाला प्राधान्य देणार आहे. कुटुंबाची पार्श्वभूमी काहीही असो सर्वांना दर्जेदार शिक्षण घेण्याचा हक्क आहे. आणि महाराष्ट्र सरकार हा एजंडा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सुरुवातीला दिल्ली शाळांचा फॉर्म्युला काही मोजक्याच शहरांमध्ये लागू केला जाणार आहे. यानंतर संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल. एवढेच नव्हे, तर मुंबई महापालिकेला दिल्लीतील शाळांचा अभ्यास करून एक प्लॅन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.