आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वत्सा, हे युद्ध लढावेच लागेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकीच्या महाभारतात बऱ्याच वेळा सगेसोयरे एकमेकांसमोर उभे असतात. यंदाची निवडणूकही यास अपवाद नाही. समोर आपलेच नातेवाईक पाहून ऐन युद्धाच्या वेळी आपल्याच माणसांविरोधात हे रण कसे करू, या संभ्रमात असलेल्यांना अनुभवी सारथी मार्गदर्शन करताहेत...  

वत्स  : कृष्णा, या समरभूमीवर युद्धाला 
सज्ज आणि अधीर असलेले माझे नातेवाईक  आणि आप्तांना पाहून मी गलितगात्र झालो आहे. माझ्या शरीराला कंप सुटला आहे. आपल्याच लोकांशी मी कसा लढू?

सारथी : वत्सा, मी युद्ध करणार नाही, हे तू ज्या अहंकाराने म्हणत आहेस तो मिथ्या आहे, कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्धाला भाग पाडेल.

वत्स : ज्यांच्यासाठी राज्य, सत्ता पाहिजे ते गुरुजन, आजोबा, काका, मामा, त्यांची मुले, मेहुणे, नातू आणि इतरही अनेक नातेवाईक धन आणि जीवनाची आशा त्यागून युद्धाला उभे राहिले आहेत. त्यांच्याशी मी लढाई करू?

सारथी : तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्य या अवस्थेत शास्त्र हेच प्रमाण आहे, हे जाणून घे. शास्त्राने ठरवून दिलेले कर्म करणे हेच योग्य आहे. म्हणून तुला भावना बाजूला ठेवून त्यांच्याशी हे युद्ध लढावेच लागेल.

बातम्या आणखी आहेत...