सत्ता संघर्ष / अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असे उद्धव यांनी भाजपकडून लेखी आश्वासन घ्यावे; शिवसेनेच्या बैठकीत आमदारांची मागणी

महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीला 161 जागा मिळाल्या आहेत

दिव्य मराठी वेब टीम

Oct 26,2019 03:18:34 PM IST

मुंबई - सरकार स्थापनेत शिवसेनेच्या भागीदारीबाबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मातोश्रीवर पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. शिवसेनेने भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा 50-50 चा फॉर्म्युलाची आठवण देत अडीच वर्षांसाठी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी करणार असल्याचे ठरवले आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी भाजप हाय कमांडकडून लेखी आश्वासन घ्यावे असे शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.


मातोश्री बाहेर ' महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त आदित्य ठाकरे' असे घोषणाबाजी लिहिलेले पोस्टर लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने 161 जागांवर विजय मिळवला आहे. यात भाजपला 105 आणि शिवसेना 56

निवडणुकीपूर्वी झाला होती चर्चा - उद्धव ठाकरे

गुरुवारी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले होते की, लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्ता स्थापनेबाबत सर्व चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे त्यावेळेस जो फॉर्म्यूला ठरला आहे, त्यानुसार सत्ता स्थापन होईल. तसेच पक्षातील आमदारांशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील निकाल-

भारतीय जनता पक्ष 105
शिवसेना 56
काँग्रेस 44
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 54
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 01
बहुजन विकास आघाडी 00
इतर 28
X
COMMENT