आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनरेशन 2.0 : राजकारणाचे बाळकडू, नवी ओळख घडवण्याचा प्रयत्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदार जोशी | औरंगाबाद

राजकीय घराण्यात जन्म झाल्यामुळे बालपणापासूनच वलयात राहिलेली ही पिढी. कोणी ड्रमर, कुणी कवी, तर कोणाला व्यवसायात यशस्वी. राजकारणातील ही नेक्स्ट जनरेशन आता प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात उतरली आहे. घराणेशाहीतून प्रवेश सुकर झाला असला तरी ही नवी पिढी विविध कार्यक्रम-यात्रा-सामाजिक उपक्रमांतून आपली नवी ओळख निर्माण करू पाहत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या नेत्यांची राज्यात चर्चा आणि हवा आहे. त्यांचा हा संक्षिप्त अल्पपरिचय.

  • सत्यजित सुधीर तांबे, अहमदनगर

वय : ३५ वर्षे । शिक्षण : एमए राज्यशास्त्र, एमबीएम। छंद : वाचन 

राजकारणात : २००० पासून कार्यरत. 

निवडणूक : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात भाचे आहेत. २०१४ मध्ये संजय जगतापांविरुद्ध निवडणूक लढवली. वडील पदवीधर मतदारसंघाचे आमदार, तर आई संगमनेरच्या नगराध्यक्षा आहेत. 

सामाजिक काम : विविध सामाजिक प्रश्नांसाठी युवकांचे संघटन.

सकारात्मक गोष्टी : आक्रमक भाषण शैली

  • आदित्य उद्धव ठाकरे, मुंंबई

वय : २९ वर्षे । शिक्षण : बीए, सेंट झेव्हियर्स कॉलेज, मुंबई । छंद : कविता 

राजकारणात : २०१० पासून युवासेना प्रमुख. बाळासाहेब ठाकरेंनी २०१० मध्ये आदित्य यांच्या हातात तलवार देऊन युवासेनेची स्थापना केली.

निवडणूक : आदित्य यांच्या रूपाने प्रथमच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणूक लढवणार.

सामाजिक काम :  स्वच्छ मुंबईसाठी प्रयत्न. ओपन जिम आणि महिलांना संरक्षणाचे धडे. 

सकारात्मक गोष्टी : वक्तृत्व, शिवसेनेच्या बदलत्या प्रतिमेची सुरुवात. 

  • रोहित राजेंद्र पवार, बारामती

वय : ३४ वर्षे । शिक्षण : व्यवस्थापनशास्त्रात पदवी, मुंबई विद्यापीठ

राजकारणात : रोहित हे शरद पवारांचे नातू आहेत. रोहित २०१७ मध्ये पहिल्यांदा पुणे जिल्हा परिषदेवर गेले. आता कर्जत-जामखेड मतदारसंघामधून प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात उभे आहेत.

सामाजिक काम : आरोग्य शिबिरातून शस्त्रक्रिया घडवून आणल्या. सृजन क्रिकेट स्पर्धा व भजन स्पर्धेच्या माध्यमातून अनेक कामे.

सकारात्मक गोष्टी : आक्रमक आणि मुद्देसूद वक्तृत्व शैली. सर्वसामान्यांशी दांडगा जनसंपर्क. 

  • सुजात प्रकाश आंबेडकर, पुणे

वय : २५ वर्षे । शिक्षण : राज्यशास्त्रात पदवी, फर्ग्युसन महाविद्यालय, पत्रकारितेचा डिप्लोमा, चेन्नईचे एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम

निवडणूक : आतापर्यंत एकही निवडणूक लढवली नाही. मात्र मागील लोकसभा निवडणुकीत प्रचारात सक्रिय सहभाग, सोशल मीडिया आणि वॉररूम सांभाळण्याची जबाबदारी.

राजकारणात : २०१९ लोकसभा निवडणुकीपासून सक्रिय राजकारणात.

सकारात्मक गोष्टी : वक्तृत्व चांगले. 

बातम्या आणखी आहेत...