आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठी तयार, निर्णय शिवसेनेने घ्यावा- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तयार असून शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न करू. युतीसाठी आमची तयारी असून आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे, असे अर्थमंत्री सुधर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

 

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक बुधवारपासून मुंबईत सुरु झाली. बैठकीच्या पहिल्या सत्राला भाजपचे सर्व नेते उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेबरोबरच्या युतीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, 'भाजपा शिवसेनेसोबत युती करण्यासाठी निश्चितपणे तयार आहे. आमची पहिल्यापासून युतीचीच भूमिका असून आम्ही ती नेहमी मांडतही आलो आहोत. आणि भविष्यातही शेवटच्या क्षणापर्यंत युतीच व्हावी अशी इच्छा आहे.  मात्र आता निर्णय शिवेसनेला घ्यायचा आहे. कार्यसमितीमध्ये पदाधिका-यांचे असेच स्पष्ट मत आहे.' मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतही हे मत आणि धारण निश्चित करण्यात आले आहे असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

 

युती झाल्यानंतर भाजप मोठा भाऊ आणि शिवसेना लहान भाऊ असे ठरवून जागा वाटप होणार का असे विचारता सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जागा वाटप कसे करायचे याची चर्चा जाहीरपणे होत नाही. युतीचा निर्णय झाल्यानंतर आम्ही एकत्र बसू आणि चर्चा करू. जागा महत्वाच्या नाही तर युती होणे महत्वाचे आहे. आम्ही वेगळे लढलो तर काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होईल. त्यामुळे एकत्र लढणे आवश्यक आहे. यापूर्वी आम्ही वेगळे लढलो परंतु नंतर एकत्र आलो आहोत. युतीबाबत जास्त माहितीसाठी शिवसेना नेत्यांना विचारा असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...