आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा होकार ? शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेला16, राष्ट्रवादीला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रीपदे

बैठकीला दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. तब्बल दोन तासानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे बैठकीतून बाहेर आले. यावेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नावार एकमत झाल्याचं सांगितलं. तसेच, आमची सर्व मु्द्द्यांवर व्यापक चर्चा झाली. आम्हला एकही मुद्दा आम्हाला अनुत्तरीत ठेवायचा नाही. जवळपास सर्व मुद्दयांवर एकमत झाले आहे. सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच आम्ही माध्यमासमोर येवून घोषणा करू असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.

5 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल- संजय राऊत
 
आज संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसैनिकांची इच्छा आहे. यावेळी भाजपकडून अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाल्याच्या वृत्तांचे त्यांनी खंडन केले. ते म्हणाले की, आता आम्हाला त्यांनी इंद्राचे सिंहासन दिले तरी, आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाहीत.

ही महाविकास आघाडी नाही तर संधी साधू आघाडी आहे- नितीन गडकरी
 
"या दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक ताळमेळ नाही. शिवसेनेच्या विचारधारेला काँग्रेसने कायमच कडाडून विरोध केला आहे. तर काँग्रेसच्या विचारधारेला शिवसेनेने विरोध केला आहे हे आपण जाणतोच. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची विचारधाराही शिवसेनेपेक्षा वेगळी आहे. विचारांच्या आणि सिद्धांतांच्या आधारे ही महाविकास आघाडी झालेली नाही. ही फक्त संधी साधू आघाडी आहे. त्यामुळेच ही महाविकास आघाडी टिकणार नाही आणि महाराष्ट्रात स्थिर सरकारही देऊ शकणार नाही. महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होईल. हे जनतेसाठी चांगलं नाही. भाजपा आणि शिवसेनेची युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली होती. मात्र महाराष्ट्रात आत्ता होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण आहे, " अशीही टीका गडकरींनी केली आहे.हा असेल पदांचा फॉर्म्यूला ?
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही पक्षात पदांचा समान वाटा होणार आहे. सुरुवातील अशी माहीती आली होती की, चार आमदारांमध्ये एक मंत्रीपद, पण काँग्रेसची मागणी होती की, सत्ते समान वाटा व्हावा. यावर तिन्ही पक्षांमध्ये समंती झाल्याची माहिती आहे. पण, सत्तेतील फॉर्म्यूल्यावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीये. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची विभागणी होणर, अशीही माहिती आले.

समन्वय समिती स्थापन
 
या महाविकास आघाडीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिन्ही पक्षातील जेष्ठ नेत्यांची एक समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. यात मुख्यमंत्र्याशिवाय तिन्ही पक्षातील नेते सामील होतील.