आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीचा कार्यक्रम रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नवीन समिकरणाने भाजपच्या पोटात दुखतेय अशी टीका सामनातील अग्रलेखातून करण्यात आली आहे. '105 किंकाळ्या... आणि वेड्यांचा घोडेबाजार' असे या लेखाला शीर्षक देण्यात आले आहे. त्यानुसार, "महाराष्ट्रातील नवीन समिकरणाने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले आहेत. सरकार बनवलेच तर ते कसे आणि किती दिवस टिकते असे शाप दिले जात आहेत. स्वतःचे षंढत्व लपवण्यासाठी सुरू झालेले हे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर येणार आहेत. महाराष्ट्राचे मालक आणि देशाचे बाप आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी या खुळ्या मानसिकतेतून सर्वप्रथम बाहेर पडले पाहिजे. ही मानसिक अवस्था 105 वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे."

राज्यपालांची भेट घेण्याचा कार्यक्रम रद्द

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार होते. नियोजित वेळेनुसार, शनिवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास ही भेट होणार होती. परंतु, ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या भेटीमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला जाणार नव्हता. तर शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यपालांसमोर मांडले जाणार होते. सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी अजुन वेळ आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारीच नागपूर येथे बोलताना स्पष्ट केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या भेटीची माहिती दिली होती. राज्यात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तत्पूर्वी भाजप, शिवसेना सत्ता स्थापित करण्यात अपयशी ठरले. यानंतर राज्यपालांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी सुद्धा वाढीव मुदत नकारत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली.