आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Government Forgot To Mention Ambedkar Chatrapati Shivaji Phule Anniversary In 2019 Calendar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र सरकारची मोठी चूक! 2019च्या सरकारी कॅलेंडरमधून महापुरुषांच्या पुण्यतिथी गायब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र सरकारकडून झालेली एक मोठी चूक उघडकीस आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथींचा सन 2019 च्या कॅलेंडरमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. मंत्रालयाचे सर्व विभाग आणि राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालयांना तसेच संघटनांना वितरित करण्यात आलेल्या कॅलेंडरमध्ये महात्मा फुले (28 नोव्हेंबर) आणि बाबासाहेब आंबेडकर (6 डिसेंबर) यांच्यासहित इतर महापुरुषांच्या पुण्यतिथींचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. 

 

आश्चर्याची बाब म्हणजे, जागतिक एड्स दिन (1 डिसेंबर) आणि जागतिक दिव्यांग दिन (3 डिसेंबर) यासारख्या तिथींचा उल्लेख आहे, परंतु या भारताचे शिल्पकार असलेल्या महापुरुषांची पुण्यतिथी कॅलेंडरमध्ये नसल्याने विरोधी पक्षांनी रान उठवण्याची तयारी सुरू केली आहे.

विधानसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याला अत्यंत गंभीर चूक म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच यासाठी जबाबदार कोण, हे जाणून घेण्याची मागणी केली आहे. विखे-पाटील म्हणाले, "हे (भाजप-शिवसेना) सरकार फक्त राजकीय फायद्यासाठीच या महापुरुषांच्या नावाचा वापर करते, परंतु वार्षिक दिनदर्शिकेत त्यांची नावे विसरून जाते."

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे म्हणाले की, ही चूक दोन महापुरुष फुले आणि आंबेडकरांच्या कार्याचा अपमान आहे. त्यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांकडून माफीची मागणी केली. मुंडे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे की, या महापुरुषांची नावे आणि चित्र कॅलेंडरमधून कसे हटवण्यात आले, यासाठी जबाबदार कोण आहे, आणि त्यांच्याविरुद्ध काय कारवाई केली जाणार आहे?"

 

सरकारी दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी,महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नसावा ही गंभीर बाब आहे.या सरकारकडुन वारंवार महामानवांचा अवमान होत आहे.माहिती व जनसंपर्क विभाग वारंवार चुका करत असतांना कारवाई मात्र केली जात नाही.या सरकारला महामानवांच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत का?

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 5, 2019

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी 'महापरिनिर्वाण दिना'च्या रूपात साजरी केली जाते. लाखो दलित आणि बौद्ध अनुयायी त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी मुंबईच्या दादरमध्ये एकत्र येत असतात. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू आणि फुले यांच्या नावाचा वापरही सर्व राजकीय नेते आपापल्या भाषण, मोर्चांमध्ये करत असतात, परंतु सरकारकडून यावर आतापर्यंत कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही.