आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Maharashtra Government Formation Congress NCP Meeting Today News On Shiv Sena Alliance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार स्थापनेसंदर्भात आज दिल्लीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक, शरद पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापन संदर्भात बुधवारी दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अहमद पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित राहतील. यासोबतच आज होणाऱ्या बैठकीत काँग्रेसकडून सरचिटणीस अहमद पटेल, महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार; तर राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, विधिमंडळ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सहभाग असेल. या दरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार आज पंत्रप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ शकतात. पवार मोदींकडे राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी करू शकतात.   

उद्यापर्यंत सरकार स्थापनेविषयी चित्र स्पष्ट होईल - राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी सांगतिले की, "गुरुवारपर्यंत सत्तास्थापनेविषयी सर्व गोष्टी स्पष्ट होतील. डिसेंबर महिन्यात राजण्यात नवीन सरकार स्थापन होईल. पुन्हा एकदा भाजपवर टीका करत म्हणाले की, राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप स्थिर सरकार देऊ शकत नाहीये, यामुळे इतर पक्षांवर राज्यात स्थिर सरकार देण्याची जबाबदारी येते."

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीविषयी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांनी सांगितले की- "पंतप्रधानांना एखादा नेता भेटला तर खिचडीच शिजते का? उद्या जर उद्धव ठाकरे मोदींना शेतकऱ्यांच्या चर्चेसाठी भेटले तर राजकीय खिचडीच शिजणार का? शरद पवार कृषी क्षेत्राचे जाणकार व्यक्ती आहेत, आम्ही त्यांना 2 दिवसांपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मोदींसमोर मांडाव्यात अशी विनंती केली होती.

बातम्या आणखी आहेत...