आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेल्स आणि वेडिंग व्हेन्यूमध्ये होणार रुपांतर; MTDC ने केली 25 किल्ल्यांची निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांते विवाह स्थळ आणि हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचे ठरवले आहे.. हेरिटेज टुरिझमला एमटीडीसीने राज्यातील 25 ऐतिहासिक गड किल्ल्यांची निवड केली आहे. राज्यातील किल्ल्यांचे जतन होण्याऐवजी त्यांचे हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये रूपांतरण करणे दुर्दैवी असल्याचे सर्वसामान्यां म्हणणे आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांनी सोशल मीडियावर चीड व्यक्त केली आहे. 

राज्य मंत्रिमंडळाने किल्ल्यांना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाबाबत तीन सप्टेंबर रोजी निर्णय घेतला होता. या नवीन धोरणानुसार संरक्षित स्मारकांच्या यादीत आणि सरकारी जमिनीवर नसलेले राज्याच्या मालकीचे भाड्याने देण्यास अनुमती देण्यात येते. 60 ते 90 वर्षांसाठी रेव्हेन्यू शेअरिंग पद्धतीने हे किल्ले भाड्याने देण्यात येतील. यासाठी पर्यटन विभाग हेरिटेज हॉटेल्स आणि चेन्सना निमंत्रित करुन भागीदारांना शॉर्ट लिस्ट करणार आहेत. 
अलिकडच्या काळात राजवाडे आणि किल्ल्यांमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याची पद्धत रुजत आहे. यामुळे पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचे सरकारने ठरवले आहे. यामध्ये राज्यातील गड-किल्ले हेरिटेज हॉटेलियर्स आणि हॉस्पिटॅलिटीचेन्सना भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राने याबाबत बातमी दिली आहे. 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
 

संताप अनावर होत आहे -  जितेंद्र आव्हा

   

सरकारच्या या निर्णयाचा ठामपणे विरोध करतो - सुप्रिया सुळे
 

   

औरंगजेबाला जे जमले नाही ते या सरकारने करून दाखवले - डॉ.अमोल कोल्हे